Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीकचऱ्यामुळे जगबुडी नदीपात्र बकाल

कचऱ्यामुळे जगबुडी नदीपात्र बकाल

खेड (प्रतिनिधी) :खेड शहरातील जगबुडी नदीपात्रात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रात्री-अपरात्री फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे नदीपात्र दूषित बनत चालले आहे. संबंधित विभाग अजूनही कारवाईसाठी पुढे सरसावत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जगबुडी नदीपात्रात पोहण्यासह कपडे धुणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच जगबुडी नदीपात्रात तरंगणाऱ्या कचऱ्यामुळे हे पात्र बकाल बनले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने कचरा फेकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तंबी दिल्यानंतर नदीपात्रात कचरा फेकणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. जगबुडी नदीपात्रात मगरीही मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांच्या मृत्यूचाही उलगडा अद्यापही झालेला नाही. मात्र नगर प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेनंतर जगबुडी नदीपात्र स्वच्छ होऊन जगबुडीने मोकळा श्वास टाकला होता.

मात्र गेल्या काही दिवसांपासून जगबुडी नदीपात्रात रात्री-अपरात्री कचरा फेकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. फळविक्रेत्यांसह चिकन विक्रेते नदीपात्रात कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र नगर प्रशासन अजूनही कारवाईसाठी पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कचऱ्यामुळे नदीपात्र पुन्हा बकाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -