Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबई - गोवा सुस्साट; केवळ ७ तासांत कोकणात

मुंबई – गोवा सुस्साट; केवळ ७ तासांत कोकणात

‘वंदे भारत’ने विक्रमी वेळेत गाठले मडगाव

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई-गोवा रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या उद्देशाने मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई – गोवा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत सीएसएमटी ते मडगाव हे अंतर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने अवघ्या ७ तासांत पार केले. या मार्गावर सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी तेजस एक्स्प्रेस आठ तासांहून अधिक वेळ घेते. मात्र ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या चाचणीतच विक्रमी प्रवासाची वेळ नोंदवण्यात आली. त्यामुळे रेल्वेने मुंबई – गोवा प्रवास करताना कमीत कमी एक तासाची बचत होण्याची शक्यता आहे. चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधील भारतीय बनावटीची सेमी-हायस्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आहे. देशातील सर्वात पहिली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावली.

पर्यटनाला चालना
मुंबई – गोवा वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबईकर आणि पर्यटकांचा प्रवासाचा अनुभव आणखी बदलण्याची अपेक्षा आहे. चाचण्यांनी एक्स्प्रेसची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि प्रवासी सुविधांची कठोर चाचणी घेतली जात आहे. मुंबई आणि गोवा या दोन्ही ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याची आणि आर्थिक वाढ होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

7 COMMENTS

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -