Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीहा कुजका मेंदू कुणाचा?

हा कुजका मेंदू कुणाचा?

फडणवीसांच्या टीकेवर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा!

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना ‘तुमच्यासारख्या कुजक्या लोकांच्या मेंदूला सरळ केल्यानंतर सावरकरांना भारतरत्न मिळेल’ असे म्हटल्याने हा कुजका मेंदू नेमका कुणाचा? यावरुन राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत आहे.

नागपूर येथे सावरकर गौरव यात्रेत बोलताना फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा यावरुन भाजपवर ठाकरे गटाकडून टीका करण्यात येते. या त्यांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी त्यांना चांगलेच झापले. यांच्याकडे एकच मुद्दा आहे, तो म्हणजे सावरकरांना भारतरत्न द्या. सावरकर हे भारतरत्न आहेतच. सावरकरांना भारतरत्न मिळायचा तेव्हा मिळेलच. आज देशामध्ये अनेल लोक असे आहेत की ज्यांना भारतरत्न मिळालेला नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंना अजून भारतरत्न मिळालेला नाही. सावरकरांना भारतरत्न जरुर मिळेल पण तुमच्यासारख्या कुजक्या लोकांच्या मेंदूला सरळ केल्यानंतर सावरकरांना भारतरत्न मिळेल, अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली.

त्यांच्या या टीकेनंतर ‘कुजका मेंदू’ अशी टीका त्यांनी नेमकी कुणावर केली यावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नेमकी ही टीका उद्धव ठाकरेंवर, संजय राऊतांवर, राहुल गांधींवर होती की आणखी कुणावर? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, यावेळी राहुल गांधींवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, ‘राहुल गांधी म्हणाले की माफी मागायला मी सावरकर नाही. पण सावरकर होण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. सावरकरांना ज्या छोट्याशा खोलीत डांबल होतं त्याच ठिकाणी राहुल गांधींना मी एसी लावून देतो त्यांनी एक रात्र राहुन दाखवावं’, असे खुले आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -