Sunday, May 5, 2024
Homeदेश६ राज्यांच्या ७ विधानसभा जागांवर आज मतदान, INDIA आणि NDA यांच्यात टक्कर

६ राज्यांच्या ७ विधानसभा जागांवर आज मतदान, INDIA आणि NDA यांच्यात टक्कर

नवी दिल्ली : जिथे एकीकडे सर्व राजकीय पक्ष २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी (loksabha election 2024) जीवतोड मेहनत करत आहेत तर त्याआधी ५ सप्टेंबरला एक सामना पोटनिवडणुकीच्या (by election) रंगात रंगणार आहे. ५ सप्टेंबरला ६ राज्यांच्या ७ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या सर्व जागांवर ५ तारखेला मतदान होत आहे. तर मतमोजणी ८ सप्टेंबरला होणार आहे.

आज पश्चिम बंगालमधील धुपगुडी, त्रिपुरा येथील धनपूर आणि बॉक्सनगर, केरळमधील पुथुपुल्ली, उत्तर प्रदेशातील घोसी, उत्तराखंडमधील बागेश्वर आणि झारखंडमधील डुमरी येथील विधानसभेसाठी मतदान होत आहे.

या सात जागांवर होत असलेली पोटनिवडणूक ही इंडिया आघाडीसाठी एक आव्हान म्हणून पाहिले जात आहे.
कारण इतके पक्ष एकत्र येणे आणि आघाडी बनल्यानंतर ही कोणत्याही राज्यातील पहिली निवडणूक आहे. अशातच भाजप या पोटनिवडणुकीत विजयी बनत आपला जलवा कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर आघाडीसाठी ही मोठी अग्निपरीक्षाच असेल.

झारखंडमधील जागेवर इंडिया आघाडीच्या उमेदवार बेबी देव या भाजपच्या उमेदवार यशोदा देवी यांच्याविरोधात उभ्या आहेत. तर केरळच्या पुथुपुल्लीमध्ये काँग्रेसचे नेतृत्व यूडीएफचे चंडी ओमन, सीपीआयएमचे नेतृत्व एलडीएफचे जॅक सी थॉमस आणि भाजपचे नेतृत्व असलेल्या एनडीएचे लिगिनलाल यांच्याकडे आहे.

त्रिपुराच्या बॉक्सनगर जागेवर भाजपाने तफज्जल हुसैन यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात सीपीएमचे मिजान हुसैन आहेत. त्रिपुराच्याच धनपूर जागेवर भाजपाचे बिंदू देबनाथ आणि सीपीएमचे कौशिक चंद्र यांच्यात सरळ लढाई होत आहे. पश्चिम बंगालमदील या जागेवर काँग्रेसकडून इश्वर चंद्र रॉय यांना समर्थन देण्यात आले आहे तर टीएमसीने राजबोंगशी समुदायाच्या निर्मल चंद्र रॉय यांना मैदानात उतरवले आहे.

उत्तराखंडमधील बागेश्वर विधानसभा जागेवरून भाजपाकडून पार्वती दास, काँग्रेसचे बसंत कुमार, युकेडीचे अर्जुन देव, उत्तराखंड परिवर्तन पक्षाकडून भागवत कोहली आणि एसपीचे भगवती प्रसाद मैदानात आहेत. उत्तर प्रदेशातील घोषी विधानसभेच्या जागेवर भाजपकडून दारा सिंह चौहान आणि सपाच्या सुधाकर सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -