Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha Reservation : शिवनेरी किल्ल्यावर आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत केलं सूचक विधान

Maratha Reservation : शिवनेरी किल्ल्यावर आज मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत केलं सूचक विधान

म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी…

पुणे : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जवळ आलेल्या असताना राज्य सरकारसमोर मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याचे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करत असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मराठा समाज आणखी संतापायच्या आत मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारच्या वेगाने हालचाली सुरु आहेत. त्यातच आज शिवजयंती (Shivjayanti) सोहळ्यासाठी किल्ले शिवनेरीवर (Shivneri fort) आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवनेरीवरून मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान केलं आहे.

शिवजयंती सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण काम करतोय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या आपण विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी उद्या खास अधिवेशन बोलावलेलं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं हे सरकार आहे. तसेच राज्याचा सर्वांगीण विकास साधणारं हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यामधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारनेही कुणबी नोंदी न आढळलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना स्वतंत्रपणे मराठा आरक्षण देण्याची तयारी केल्याचं वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या बोलावलेल्या अधिवेशनात नेमका काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -