Monday, May 20, 2024
Homeदेशचंदीगढ महापौर निवडणूक : भाजपचा विजय, असा बिघडला काँग्रेस-आपचा गेम

चंदीगढ महापौर निवडणूक : भाजपचा विजय, असा बिघडला काँग्रेस-आपचा गेम

नवी दिल्ली: चंदीगढच्या महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे. भाजप संख्याबळाच्या दृष्टीने काँग्रेस आणि आम आदमी पक्ष मागे होता. १६ मतांसह मनोज सोनकर ही निवडणूक जिंकत चंदीगढ शहरातील पुढील महापौर म्हणून निवडून आलेत.

चंदीगढ महापालिकेत भाजपचे १४ नगरसेवक आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे. भाजपनंतर १३ नगरसेवकंसह आम आदमी पक्ष चंदीगढ महापालिकेतील दुसरा सगळ्यात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे ७ नगरसेवक आहेत आणि एक नगरसेवक शिरोमणी अकाली दलचे आहेत.

चंदीगढ महापौर निवडणुकीत स्थानिक खासदारांनाही मतदानाचा अधिकार आहे. चंदीगढमध्ये भाजपच्या किरण खेर खासदार आहे. किरण खेर यांना पकडले तर भाजपची संख्या १५ होते. तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची मिळून संख्याबळ २० नगरसेवक आहेत.

चंदीगढ महापालिकेत एकूण ३५ नगरसेवक आहेत आणि एक खासदाराचे मत असते. एकूण ३६ मते असलेल्या महापौर निवडणुकीत विजय सुनिश्चित करण्यासाठी १९ मते मिळणे गरजेचे होते. भाजपकडे त्यांचे नगरसेवक, खासदार मिळून एकूण मते १५ होत होी. शिरोमणी अकाली दलाचे एक मत जोडले असता ही संख्या १६पर्यंत पोहोचत हती. दुसरीकडे आम आदमी पक्षाचे १३ आणि काँग्रेसचे सात मिळून हा आकडा २० पर्यंत पोहोचत होता. दोन्ही पक्षांनी एकत्र मिळून उमेदवार उतरवल्यानंतर या निवडणुकीतील विजय त्यांच्यासाठी सुनिश्चित मानला जात होता. मात्र जेव्हा निकाल हाती आला तेव्हा भाजपने विजयी पताका फडकावली होती.

महापौर निवडणूकीसाठी सर्व ३५ नगरसेवक आणि खासदार किरण खेर यांनी मतदान केले. मतदानानंतर मतमोजणी सुरू झाली. भाजप उमेदवाराला १६ मते पडली होती. शिरोमणी अकाली दलाचे एकमेव मत जोडून मतांचा आकडा १६वर पोहोचला होता. तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवाराल २० मते मिळाली होती.

आता असे झाले की काँग्रेस-आप उमेदवाराच्या पक्षात मिळालेल्या २० मतांपैकी ८ मते रिजेक्ट झाली. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची मते १३ अधिक सात म्हणजेच २०. मात्र त्यातील ८ मते रिजेक्ट झाल्याने त्यांच्याकडे १२ मतेच राहिले. यामुळे भाजपला विजय मिळाला तर आप आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -