Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीहृदयविकाराचा झटका आल्याने बस ड्रायव्हरचा मृत्यू, मात्र हुशारीने वाचवला प्रवाशांचा जीव

हृदयविकाराचा झटका आल्याने बस ड्रायव्हरचा मृत्यू, मात्र हुशारीने वाचवला प्रवाशांचा जीव

बालेश्वर: ओडिशाच्या बालेश्वर जिल्ह्यात मंगळवारी एक घटना समोर आली. यात एक बस चालवत असलेल्या ड्रायव्हरला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र थोडेआधीच त्याला हे समजल्याने आपल्या सावधगिरीने त्याने प्रवाशांचा जीव वाचवला. आपल्या मृत्यूआधी त्याने बसला थांबवले. यामुळे ड्रायव्हरने बसमध्ये बसलेल्या ६०हून अधिक प्रवाशांचा जीव वाचवला. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बालेश्वर जिल्ह्यातील पातापूर छकमध्ये घडली. प्राथमिक तपासाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की पश्चिम बंगाल येथून पर्यटकांना घेऊन ही बस बालेश्वर जिल्ह्यातील पंचलिंगेश्वर मंदिरात जात होती. यातच बसच्या ड्रायव्हरला अचानक हृदयविकाराचा झटका झाला. यात त्याची तब्येत बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत अधिक सांगितले की जसे ड्रायव्हरला थोडे दुखणे सुरू झाले तसे त्या व्यक्ती बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध झाला. शेख अख्तर असे या मृत ड्रायव्हरचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार बस ड्रायव्हर शेख अख्तर अचानक बेशुद्ध झाल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली.यानंतर या ड्रायव्हरला जवळच्या नीलगिरी उपसंभागीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित करण्यात आले.

याबाबत बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस ड्रायव्हरची तब्येत बस चालवता चालवता अचानक बिघडली. त्याने बस एका बाजूला लावली. त्यानंतर लगेचच हा ड्रायव्हर बेशुद्ध झाला. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याला आधीच मृत घोषित करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -