Thursday, May 2, 2024
HomeदेशNDA vs INDIAची फायनल आज, ७ जागांवरील निकाल होणार घोषित

NDA vs INDIAची फायनल आज, ७ जागांवरील निकाल होणार घोषित

नवी दिल्ली : देशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ६ राज्यांतील ७ विधानसभा जागेवरील पोटनिवडणुकीचा (by election) निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल म्हणजेच नुकत्याच निर्माण झालेल्या इंडिया आघाडीसाठी मोठी परीक्षा असणार आहे. मंगळवारी यासाठीचे मतदान पार पडले होते.

सात जागांचा लेखाजोगा

उत्तराखंडमध्ये बागेश्वर, उत्तर प्रदेशात घोसी, केरळमध्ये पुथुपुल्ली, पश्चिम बंगालमध्ये धुपगुडी, झारखंडमध्ये डुमरी आणि त्रिपुरामध्ये बॉक्सानगर आणि धनपूर विधानसभा मतदारसंघात ५ सप्टेंबरला मतदान झाले होते. या सात जागांपैकी तीन जागांवर(धनपूर, बागेश्वर आणि धुपगुडी)भाजपची सत्ता तर एक-एक जागेवर सपा(घोसी), सीपीआयएम(बॉक्सनगर), जेएमएम(डुमरी) आणि काँग्रेस(पुथुपुल्ली) यांची सत्ता आहे.

पश्चिम बंगालच्या धुपगुडू आणि केरळच्या पुथुपुल्ली इंडियाचे घटक पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढत आहे. धुपगुडीमध्ये ७६ टक्के तर पुथुपुल्लीमध्ये ७३ टक्के मतदान झाले होते.

उत्तर प्रदेशच्या घोसी मतदारसंघात इंडियाने संयुक्त मोर्चा बनवला होता. येथे साधारण ५०.३० टक्के मतदानाची नोंद झाली. झारखंडच्या डुमरीमध्ये जिथे २.९८ लाख मतदांरांपैकी ६४.८४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात टक्कर पाहायला मिळाली. येथे ५५.४४ टक्के मतदान झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -