कच्छ: बिपरजॉय चक्रीवादळ काल रात्री गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छला धडकले. लँडफॉलची प्रक्रिया पुर्ण झाली असून चक्रीवादळामुळे ताशी सध्या ११५ ते १२५ किमी वेगाने वारे वाहत आहेत. काल याच वाऱ्याचा जोर वादळ धडकताना १५० किमी ताशी होता. जोरदार वाऱ्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छच्या अनेक भागात नुकसान झाले.
मध्यरात्रीपासून लँडफॉल सुरू झाला आहे. चक्रीवादळामुळे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू आणि २२ जण जखमी झाले आहेत. यात २३ जनावारांचाही मृत्यू झाला आहे. तर झाडांचे आणि वीजेच्या खांबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ५२४ झाडे तर ३०० विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे ९४० गावांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
हेही वाचा…
Cyclone Biparjoy: बिपरजॉय वादळाने धडकण्याच्या आधीच ९ जणांचा घेतला बळी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे वादळ उद्या (१७ जून) दक्षिण राजस्थानमध्ये पोहोचेल. त्यामुळं तिथे हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सखल भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गुजरातमध्येही आज पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यात कच्छ, पाटण, बनासकांठा येथे अधिक पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.