Thursday, May 2, 2024
HomeदेशBihar : नितीश कुमार ९व्यांदा बनले बिहारचे मुख्यमंत्री, या ८ मंत्र्यांनी घेतली...

Bihar : नितीश कुमार ९व्यांदा बनले बिहारचे मुख्यमंत्री, या ८ मंत्र्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली: नितीश कुमार(nitish kumar) आज बिहारचे(bihar) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना ९व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आजच महागठबंधनमधून बाहेर होण्याची घोषणा करत एनडीएमध्ये सहभागाची घोषणा केली. नितीश कुमार यांच्यासह ८ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यात सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

या दोघांशिवाय भाजपकडून डॉ. प्रेम कुमार, जदयूमधून विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, विजेंद्र यादव, हममधून संतोष कुमार सुमन आणि अपक्ष सुमित कुमार सिंह यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

राबडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत सम्राट चौधरी

बिहारच्या मुंगेर येथील सम्राट चौधरी याआधीही बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. सम्राट हे राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. ते राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील शकुनी चौधरी सात वेळा खासदार होते. तर आई पार्वती देवीही खासदार होत्या. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये भाजपने त्यांना प्रदेश अध्यक्ष बनवले.

विधानसभेत अध्यक्ष राहिलेत विजय सिन्हा

विजय कुमार सिन्हा यांच्याबाबत बोलायचे झाल्यास जे भाजप-जदयूच्या पूर्वीच्या सरकारमध्ये श्रम मंत्री होते. ते २०१० पासून लखीसराय विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०२० ते २०२२ दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहिले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -