Monday, May 5, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

बेस्ट बसच्या तिकीट दरात दुप्पट वाढ

बेस्ट बसच्या तिकीट दरात दुप्पट वाढ

पाच रुपयांचे तिकीट दहा रुपये, सहा रुपयांचे तिकीट बारा रुपये 

मुंबई (प्रतिनिधी) : तोट्यात चाललेल्या बेस्ट उपक्रमाला आता बस तिकीट दरवाढीला अखेर मान्यता मिळाली असून मामध्ये बसचे तिकीट आता दुपटीने वाढवण्याच्या बेस्टच्या प्रस्ताकला महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्या साध्या बसेसाठी किमान आकारले जाणारे बस भाडे आता पाच रुपयरिवजी दहा रुपये आकारले जाणार आहे, तर वातानुकूलित बसेसचे किमान भाडे सहा रुपयांवरून बारा रुपये एवढे आकारले जाणार आहे.

महापालिकेने या तिकीट दरवाढीला मंजुरी दिल्याने पाची अंमलबजावणी तत्काळ केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता बेस्ट बस प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून यामुळे जमा होणाऱ्या चिल्लरची समस्या मिटून बेस्टच्या महसूलात वाढ होणार आहे. त्यामुळे तोट्यात चाललेल्या या बेस्टसाठी तिकीट दरवाढ ही दिलासा दायक असली तरी मुंबईकरांना काही दिवस नाक मुरडत का होईना यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. साप्ताहिक बस पास किलोमीटर सध्याचा नारिस्क बस पास ५ ७० रुपये १० १७५ रुपये १५ २० २६५ रुपये ३५० रुपये बेस्ट उपक्रम तोट्यात असल्याने महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत केली जाते; परंतु महापालिकेच्या आर्थिक मदतीवर बेस्टचे भरकटणारे तारु स्थिर होण्याची शक्यता नसल्याने महसूल वाढीसाठी त्यांना विविध उपाययोजना करण्याची गरज होती. त्यातून बेस्ट बस तिकीट दरवाढीचा पर्याय समोर आला होता,

मागील फेब्रुवारी महिन्यात याबाबतचा आढावा घेतल्यानंतर बेस्टचे प्रभारी महाव्यवस्थापक एसव्हीआर श्रीनिवासन यांनी तिकीट दरवाढीचे सुतोवाच केले होते. त्यानुसार त्यांनी बस तिकीट दरवाढीचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या वतीने मंजूर करून महापालिका प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या प्रस्तावाला प्रशासक (महापालिका) म्हणून महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. बस भाडयामध्ये किमान पाच रुपये आणि उर्वरीत प्रवास भाड्यांत टप्प्यानुसार भाडे वाढ करण्यास मंजुरी मिळाल्याने या भाडेवाढीमुळे बेस्टच्या तिजोरीत सुमारे ५९० कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. सध्या बेस्टचे सुमारे ३० हजार प्रवाशी असून त्यांच्या प्रवासी तिकीटांमधून वर्षाला ८४५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो, त्यामुळे या तिकीट दरात वाढ केल्याने वार्षिक उत्पन्न सुमारे १४०० कोटी रुपयांवर पोहोचले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विना वातानुकूलित मासिक बस पास

किलोमीटर    सध्याचा मासिक बस पास  वाढीव मासिक बस पास

५                ३०० रूपये                  ५०० रुपये १०               ७०० रुपये                   ८०० रुपये १५               १०५० रुपये                  ११०० रुपये २०                १३५० रुपये                  १७०० रुपये

विना वातानुकूलित बसेसचे भाडे

कि.मी      सध्याचे भाडे        वाढीव भाडे

५            ५ रुपये              १० रुपये १०           १० रुपये            १५ रुपये १५           १५रुपये             २० रुपये

वातानुकूलित बसेसचे भाडे

कि. मी    सध्याचे भाडे   वाढीव भाडे

५            ६ रुपये         १२ रुपये १०           १३ रुपये        २० रुपये १५           १९ रुपये        ३० रुपये २०           २५रुपये         ३५रुपये २५           २५रुपये        ४० रुपये

वातानुकूलित मासिक बस पास

किलोमीटर       सध्याचा मासिक बस पास       वाढीव मासिक बस पास

५                    ४५० रुपये                       ८०० रुपये १०                   १००० रुपये                      १२५० रुपये १५                   १६५० रुपये                      १७०० रुपये २०                   २२०० रुपये                       २६०० रुपये

Comments

पुंडलिक    April 28, 2025 09:05 AM

अत्यंत उत्तम. थोडक्यात पूर्ण माहिती मिळाली

Add Comment