
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्युरोसर्जनने आत्महत्या केली. न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली.

मुंबई : जेईई मेन्स सत्र -२च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. काल (दि १८) जेईई मेन्स सत्र -२ची उत्तरं प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर आज जेईई मेन्स ...
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी त्यांच्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकताच कुटुंबियांनी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉ. शिरीष वळसंगकर यांना कुटुंबियांनी तातडीने वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्याच वळसंगकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर उपचार सुरू झाले. सुरुवातीला प्रकृती गंभीर असल्याचे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वळसंगकर यांच्या कुटुंबियांना सांगितले. थोड्या वेळाने मृत्यूची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.
शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डॉ. शिरीष वळसंगकर यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येमागचे नेमके कारण काय आहे याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली आहे.