Monday, May 5, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजराजकीय

राहुल गांधींना अध्यक्षांनी तंबी का दिली?

राहुल गांधींना अध्यक्षांनी तंबी का दिली?

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) सभागृहातील शिष्टाचार आणि वर्तनाच्या मर्यादा पाळण्यासंबंधी बुधवारी समज दिली. काँग्रेस खासदारांनी राहुल गांधींना बोलू दिले जात नसल्याच्या तक्रारीसह अध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज काही मिनिटांसाठी तहकूब केले. विरोधी पक्ष खासदारांनी यावर नाराजी व्यक्त केली, तर भाजपने एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सभागृहातील वर्तनाच्या नियमांवर भाष्य करताना ओम बिर्ला म्हणाले, "सर्व सदस्यांनी सभागृहाच्या मर्यादा आणि प्रतिष्ठा जपली पाहिजे. या सभागृहात पिता-पुत्री, आई-मुलगा, पती-पत्नी असे सदस्य राहिले आहेत. प्रत्येकाने नियमांचे पालन करून परंपरा राखली पाहिजे. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी स्वतः शिष्टाचाराचे पालन करत इतरांसाठी आदर्श निर्माण केला पाहिजे."

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत राहुल गांधी त्यांच्या बहीण आणि खासदार प्रियांका गांधी यांच्या हनुवटीला हात लावताना आणि त्यांचा हात धरून उठण्यास सांगताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला.

ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना समज दिल्यानंतर लगेचच सभागृह काही वेळासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे राहुल गांधींना बोलण्याची संधी न मिळाल्याने त्यांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि नाराजी व्यक्त केली. "लोकसभा अध्यक्षांनी शिस्तपालनाचे आवाहन केल्यानंतर मला बोलू दिले नाही. ते उठून निघून गेले. विरोधी पक्षनेत्याला न बोलू देता अध्यक्ष सभागृह तहकूब करतात, हे चुकीचे आहे," असे राहुल गांधी म्हणाले.

Comments
Add Comment