
मोठ्या शहरात
मोठ्या शहरात मोठ्या भिंती उभ्या आडव्या सर्वत्र आडव्या भिंतीना इथे रस्ता म्हणतात तो रस्ता कुठल्यातरी भिंतीपर्यंत धावत असतो मी त्या भिंतीला हात लावतो आणि जिंकलो म्हणून उडी मारतो..
उडी मारताच वर आदळते मेंदूला वरची भिंत.. मी पुन्हा धावत सुटतो भिंतींचा सुळसुळाट बघतो....
उभ्या आडव्या सर्वत्र भिंतीच भिंती आणि भिंतीतून मी मार्ग शोधण्याचा केवळ प्रयत्न करतोय...
भिंतीपासून भिंतींपर्यंत गुर्फटतोय... फक्त आणि फक्त बंधिस्त करून घेतो तनामनाला... मोठ्या शहरात...
- संतोष खाडये, गोरेगाव (पूर्व)
सांग तू...
शल्य गं पचवून सारे सांग तू हसते कशी? तू उन्हाचे गीत गाता सावलीत दिसते कशी?
सांग तू गं कोणती किमया आहे साधली? नित्य माझ्या भोवताली तूच तू असते कशी? दुःख माझे ते नभाळी मोजमाप घेऊ कसे? तू अशी लवचिक राणी त्यात तू बसते कशी?
तू घराचा कोपरा, तू भिंत होते, छत्र तू श्वास होते तू घराचा तुझीच तू नसते कशी?
तू महिधर होऊनी झुंजते तू,तू रक्षिते अक्ष माझे ओलाविता सांग तू धसते कशी?