Monday, May 5, 2025

मनोरंजनरिलॅक्सताज्या घडामोडी

श्रेयाचा आणि किचनचा काहीही संबंध नाही 

श्रेयाचा आणि किचनचा काहीही संबंध नाही 

मुंबई:  झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. अशीच एक लोकप्रिय विनोदवीर श्रेया बुगडे जिच्यासाठी प्रेक्षकांना हसवणं तर सोपं आहे पण किचनमध्ये जाऊन जेवण बनवणं मात्र तितकंच कठीण. श्रेया आता प्रेक्षकांना हसवताना नाही तर चक्क किचनमध्ये जेवण बनवताना दिसणार आहे. हो, किचन कल्लाकारच्या आगामी भागात श्रेया महाराज म्हणजेच अभिनेता प्रशांत दामले यांच्यासाठी काही चमचमीत पदार्थ बनवताना दिसेल.

या कार्यक्रमात सहभागी कलाकारांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार सुद्धा सज्ज असतो. श्रेयाला सपोर्ट करण्यासाठी तिची आई 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, पण तिला सपोर्ट करताना तिच्या आईने हा एक मजेदार किस्सा सांगून श्रेयाची पोलखोल केली. श्रेया आणि किचनचा काहीही संबंध नाही असा खुलासा श्रेयाच्या आईने केला. कधी श्रेयाच्या घरी बाई आली नाही कि श्रेया मला फोन करून एखादा पदार्थ कसा करायचा हे विचारते? पण त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नाव देखील तिला माहिती नसतात असं श्रेयाच्या आईने सांगितलं. त्यामुळे कार्यक्रमात आता श्रेया आपल्या पाककलेने महाराजांना खुश करू शकेल का? हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल. श्रेया नक्की कुठला पदार्थ बनवणार आणि तो फसणार कि चांगला होणार? विनोदप्रमाणेच जेवण बनवणं देखील श्रेयाला जमेल का? किचनमध्ये पाऊल ठेवल्यावर तिची काय तारांबळ उडणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर किचन कल्लाकारच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.

Comments
Add Comment