Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेबडोदा - जेएनपीटी महामार्गामुळे बदलापूरमध्ये येणार ‘समृद्धी’

बडोदा – जेएनपीटी महामार्गामुळे बदलापूरमध्ये येणार ‘समृद्धी’

जमिनी आणि घरांच्या किमतीत होणार मोठी वाढ

बेंडशीळजवळ महामार्गासाठी साडेचार किमीचा बोगदा

बदलापूर (वार्ताहर): बडोदा ते जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या महाराष्ट्रात प्रगतिपथावर आहे. हा महामार्ग बदलापूरमधून जात असून त्यामुळे भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. सोबतच बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार असून पर्यायाने उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही येणार आहेत. त्यामुळे या महामार्गासोबतच ‘समृद्धी’ची दारे उघडली जाणार आहेत. या महामार्गामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा फायदा होणार असून डोंबिवली, कल्याणनंतर बदलापूरमध्ये जागेचे आणि घरांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

बडोदा ते जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या महाराष्ट्रात जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रुंद असा हा आठ पदरी महामार्ग असेल. हा रस्ता अंबरनाथ तालुक्यात बदलापूर शहराजवळून जात असून त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आले आहे. तब्बल साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार जानेवारी २०२५ पर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल, तर जून २०२५ पर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होऊन रास्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -