Sunday, May 12, 2024
Homeताज्या घडामोडी‘कोरोना’ लाट संपली; ‘डब्ल्यूएचओ’ची घोषणा

‘कोरोना’ लाट संपली; ‘डब्ल्यूएचओ’ची घोषणा

जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘जगभरात मागील जवळपास साडे-तीन वर्षांपासून हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाची लाट संपली आहे’,अशी घोषणा ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ) केली आहे. कोरोना आता जागतिक आरोग्य आणीबाणी हटविण्यात आली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन परिस्थितीबाबतच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी सांगितले की, आपत्कालीन समितीची १५ वी बैठक झाली. त्यामध्ये, कोविड-१९ला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर घोषित करावे, अशी शिफारस करण्यात आली. ही शिफारस आपण स्वीकारत असल्याचे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले.

‘डब्ल्यूएचओ’ने सांगितले की ३० जानेवारी २०२० रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली. जागतिक आरोग्य आणीबाणी मागे घेतली असली तरी कोरोनाचा जागतिक आरोग्यासाठी धोका अजूनही आहे, असे ‘डब्लूएचओ’ने स्पष्ट केले.
कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली तेव्हा चीनमध्ये १०० पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळले होते. त्यावेळी एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र तीन वर्षांनंतर हा आकडा वाढून ७० लाखांपर्यंत पोहोचला. सुमारे २० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.

जागतिक आरोग्य आणीबाणी का हटवली?
डब्ल्यूएचओने सांगितले की, गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा इतका मोठा परिणाम झाला की शाळा ते कार्यालय बंद राहिले. या काळात बरेच लोक तणाव आणि चिंतेतून गेले. त्यातून जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.

डॉ. टेड्रोस यांनी काय म्हटले?
जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी म्हटले की, जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे संपला नाही. मागील आठवड्यात दर तीन मिनिटाला कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू होत होता. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -