Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीखासगीकरणाविरोधात बँक कर्मचा-यांचा दोन दिवसांचा संप

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचा-यांचा दोन दिवसांचा संप

उद्या व परवा बँका बंद राहणार

नवी दिल्ली : बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Workers) विविध यूनियनकडून बँकांच्या खासगीकरणाविरोधात (Bank Privatization) १६ आणि १७ डिसेंबरला संप (Bank Workers strike) पुकारण्यात आला आहे. या दोन दिवसांच्या देश पातळीवरील संपाच्या काळात बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

बँक कर्मचाऱ्यांना बँक व्यवस्थापनाकडून संपावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँक कर्मचारी यूनियनने मात्र संपाची भूमिका कायम ठेवली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या हितासाठी संपावर न जाण्याचे आवाहन केले आहे.

विविध माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार बँकांचे प्रमुख, बँक असोसिएशन आणि बँक कर्मचारी यूनियन यांच्यात चर्चा सुरु आहे. बँक व्यवस्थापन सातत्याने संप रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. २०२१च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात बनवलेल्या कमिटीसंदर्भात बोलताना दोन बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे म्हटले होते. कोणत्या बँकांचे खासगीकरण करायचे यासंदर्भातील निर्णय देखील बँक खासगीकरण समिती घेणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -