ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी; मात्र, दक्षिण आफ्रिकेने झुंजवले

Share

अबुधाबी (वृत्तसंस्था) : सहाव्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर-१२ फेरीमध्ये ग्रुप १मध्ये ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी दिली. तरी शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांना चांगलेच झुंजवले.

गोलंदाजांनी गाजवलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची कामगिरी सरस ठरली. त्यांनी द. आफ्रिकेला २० षटकांत ९ बाद ११८ धावांमध्ये रोखताना विजय सुकर केला. मात्र, प्रतिस्पर्ध्यांचे ११९ धावांचे आव्हान गाठताना कांगारूंना १९.४ षटके टाकावी लागली. स्टीव्हन स्मिथने (३४ चेंडूंत ३५ धावा) महत्त्वपूर्ण योगदान देत विजयात खारीचा वाटा उचलला. त्याच्यानंतर मार्कस स्टॉइनिस (१६ चेंडूंत नाबाद २४ धावा) मॅथ्यू वॅडे (१६ चेंडूंत नाबाद २४ धावा) धावून आले.

ऑस्ट्रेलियाने ५ विकेट आणि २ चेंडू राखून द. आफ्रिकेवर मात केली तरी त्यांच्या आघाडी फळीने निराशा केली. वेगवान गोलंदाज अॅन्रिच नॉर्ट्जेने वैयक्तिक पहिल्या आणि डावातील दुसऱ्या षटकात कर्णधार आरोन फिंचला माघारी धाडले. पाच चेंडू खेळूनही तो खाते उघडू शकला नाही. अन्य सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (१५ चेंडूंत १४ धावा) आणि तिसऱ्या क्रमांकावरील मिचेल मार्शनेही (१७ चेंडूंत ११ धावा) निराशा केली.

आठव्या षटकातील ३ बाद ३८ धावा अशा बिकट स्थितीत स्मिथ, स्टॉइनिस तसेच वॅडेने विजयी नौका पार केली. तरीही पहिल्या विजयाचे क्रेडिट त्यांच्या गोलंदाजांना जाते. कांगारूंच्या पाचही गोलंदाजांनी अचूक मारा केला. वेगवान दुकली मिचेल स्टार्कसह जोश हॅझ्लेवुड तसेच फिरकीपटू अॅडम झम्पाने प्रत्येकी दोन विकेट तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र, अप्रतिम स्पेल टाकणाऱ्या हॅझ्लेवुड (४-१-१९-२) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

Recent Posts

Akshaya Tritiya 2024 : खूशखबर! अक्षय तृतीयेला सामान्यांच्या हाती सोनं

शुभ दिवशी सोने खरेदीवर मिळणार 'ही' विशेष सवलत मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या…

18 mins ago

Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांची घरवापसी; भाजपामध्ये केला पक्षप्रवेश

पालघरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने होती नाराजी मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) पालघर लोकसभेची (Palghar Loksabha) जागा…

25 mins ago

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक!

राजस्थानमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार प्रकरणात (Firing…

52 mins ago

Weather Update : तापमान ४४ अंशा पलीकडे जाणार, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा!

राज्यातील 'या' भागात सूर्याची आग तर काही भागांत पावसाचा यलो अलर्ट मुंबई : देशभरात निवडणुकांचे…

1 hour ago

Mobile: तुमच्या या चुकांमुळे मोबाईलची बॅटरी पटापट संपते

मुंबई: हल्ली मोबाईल फोन(mobile phone) सगळ्यांची गरज बनली आहे. फोन नेहमी व्यवस्थित चालू राहावा यासाठी…

3 hours ago

Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील…

4 hours ago