नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रविवारी जगभरात ‘फादर्स डे’साजरा होत असताना सामान्य नागरिकांपासून ते अनेक लोकप्रिय सेलिब्रिटिंनी आपापल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेक सेलिब्रिटिंनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांसाठी आणि मुलांसाठी भावनिक पोस्ट टाकल्या आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरसुद्धा आजच्या दिवशी भावुक झाला आहे. सचिनच्या लेकाने त्याच्यासाठी स्वयंपाकाचे प्रयोग केले आहेत. खुद्द सचिनने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.
‘अर्जुनने आज बनवलेले स्क्रॅम्बल्ड एग्जला जगातील सर्वोत्तम चव आहे. त्याचा पोत आणि चव खूप चांगली होती! त्यामध्ये त्याचे प्रेम आहे , यापेक्षा मौल्यवान काही असू शकत नाही,’ अशी पोस्ट सचिनने केली आहे. त्यासोबत त्याने अर्जुनसोबत एक फोटोही पोस्ट केला आहे.
त्यापूर्वी, सचिनने देखील आपल्या दिवंगत वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. ‘प्रत्येक मुलासाठी त्याचे वडिल हे त्याचे पहिले हिरो असतात. मीही त्यातलाच एक आहे. त्यांची शिकवण मला आजही आठवते. त्यांचे निस्वार्थ प्रेम आणि मला केलेले मार्गदर्शन मला आठवते. सर्वांना फादर्स डेच्या शुभेच्छा!’, अशी पोस्ट करत सचिनने एक व्हिडिओ शेअर केला होता.
विशेष: डॉ. सुकृत खांडेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून, आज या…
MI vs SRH: मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने…
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election 2024) तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. देशातील १२ राज्ये…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आरोप दुर्गापुर : काँग्रेस ७०-७० वर्षांपासून राम मंदिराची उभारणी रखडवत होती,…
नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आता…
मुंबई: घरात अनेकदा माहीत नसताना काही चुका अशा ज्या समस्या निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला…