Saturday, May 4, 2024
Homeकोकणरत्नागिरीअणसुरे ठरली देशातील एकमेव ग्रामपंचायत

अणसुरे ठरली देशातील एकमेव ग्रामपंचायत

जैवविविधतेवर आधारित वेबसाइट बनविणारी एकमेव ग्रामपंचायत

पुणे येथे आज ग्रामपंचायतीचा होणार गौरव

राजापूर (वार्ताहर) : सनाच्या माझी वसुंधरा योजनेअंतर्गत जैवविविधतेवर आधारित अणसुरे ग्रामपंचायतीने तयार केलेल्या वेबसाईटचा आज, रविवारी २२ मे रोजी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ आणि ग्रामपंचायतींचा सन्मान होणार आहे.

अणसुरे ग्रामपंचायतीने शासनाने जाहीर केलेल्या ‘माझी वसुंधरा’ या योजनेमध्ये अतुलनीय कामगिरी केली आहे. संपूर्ण भारतात जैवविविधतेवर आधारित वेबसाईट बनविणारी अणसुरे ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामार्फत आयोजित कार्यक्रमात या वेबसाइटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून याच कार्यक्रमात ग्रामपंचायतीला सन्मानित केले जाणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त पुणे सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिपचे सीईओ आयुष प्रसाद, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ.शेषराव पाटील, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव आदी उपस्थित राहणार आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सभागृह पुणे येथे या शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राज्यातील आठ ग्रामपंचायतीमध्ये अणसुरे ग्रामपंचायतीची या सन्मानासाठी निवड झाली आहे. मात्र या सर्व ग्रामपंचायतींमध्ये अणसुरे ही एकमेव ग्रामपंचायत आहे, जिने जैवविविधतेवर आधारित वेबसाइट बनविली आहे. या आठ ग्रामपंचायतीचे विशेष सर्वेक्षण राज्यस्तरावरिल कमिटीमार्फत येत्या चार दिवसांत होणार असून प्रथम विजेत्या ग्रामपंचायतीला तब्बल एक कोटींचा पुरस्कार मिळणार आहे. या ग्रामपंचायतीने बनविलेल्या वेबसाइटचा शुभारंभ आ. राजन साळवी यांनी डिसेंबर २०२१ मध्ये अणसुरे ग्रामपंचायत येथे केला होता.

त्यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत आणि जैवविविधता अभ्यासक तुळपुले यांनी या वेबसाइटच्या दिलेल्या प्रेझेंटेशनने प्रभावित झालेल्यासाळवी यांनी त्यांचे विशेष कौतुक करुन शुभेच्छा दिल्या होत्या. शासनाची एखादी योजना जाहीर होताच इतके प्रभावी काम करणे सोपे नव्हते मात्र अणसुरे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आणि सरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ यांना या प्रवाहात आणून हा बहुमान प्राप्त केला आहे.

पुणे येथे होत असलेल्या या कार्यक्रमाला सरपंच रामचंद्र कणेरी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत आणि जैवविविधता अभ्यासक तुळपुले उपस्थित राहणार आहेत. त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -