Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबई महानगरपालिकेची सर्व कार्यालये व रुग्णालयात मास्कसक्ती!

मुंबई महानगरपालिकेची सर्व कार्यालये व रुग्णालयात मास्कसक्ती!

मुंबई : वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने सर्व रुग्णालयात पुन्हा मास्क अनिवार्य केले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना व्हायरसच्या ५ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ३५ हजार १९९ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत एकूण १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलत आपल्या सर्व रुग्णालयात मास्क वापरण्यास सक्तीचे केले आहे. त्याशिवाय, मुंबई महापालिकेचे कार्यालय, सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय, वय ६५ वर्षांवरील अधिक वयाच्या व्यक्तींना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात सारख्या इतर राज्यांमध्ये कोरोनाच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. केरळमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाची १ हजार ७९९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात ७८८ तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ७५५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

कोविडच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी १० एप्रिल रोजी तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे. विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे असेल, असेही चहल यांनी निर्देश दिले.

याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त चहल म्हणाले की, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रूग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करावयाची आहेत. वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असे सांगितले.

महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांमधील सर्व कर्मचारी, रुग्ण तसेच अभ्यागतांना देखील मास्क लावणे हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सक्तीचे करण्यात येत आहे. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -