Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha Samaj : चिचोंडी बुद्रुक येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना, सचिवांना गावात प्रवेश...

Maratha Samaj : चिचोंडी बुद्रुक येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना, सचिवांना गावात प्रवेश बंदी

सकल मराठा समाजाचा एकमुखाने निर्णय

येवला : मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षातील नेत्यांना व सचिवांना गावात प्रवेश बंदी करण्यात येत असल्याचा फलक सकल मराठा समाज्याच्या वतीने आज शनिवारी येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथे लावण्यात आला. यापूर्वी तहसीलदार आबा महाजन, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, शहर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.

आज गावात ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देण्यात आल्या. संपूर्ण राज्यभर मराठा समाजाचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. सरकारला जागे करण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे आज गावात नेत्यांना गाव बंद करण्यात आले.

यावेळी गावातील जेष्ठ नागरिक अर्जुन मढवई, केशव मढवई, विकास संस्थेचे माजी चेअरमन बबन मढवई, संजय मढवई, माजी सरपंच रवींद्र गुंजाळ, माजी उपसरपंच नंदू घोटेकर, सरपंच प्रभाकर सूर्यवंशी, उपसरपंच संतोष गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घोटेकर, प्रमोद पाटील, संजय मढवई, आनंदा गुंड, नारायण खराटे, सुखदेव मढवई, सागर भाकरे, निखिल खराटे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, नितीन पुणे, आबा महाराज खराटे, मदन महाराज खराटे, शरद महाराज घोटेकर, विश्वास पवार, दत्तू पवार, साईनाथ मढवई, प्रदीप पाटील, संजय त्र्यंबक मढवई, सतीश मढवई, बबन मढवई, भाऊसाहेब खटाने, दत्तू मढवई, भाऊसाहेब रोकडे, शिवाजी पवार, अंकुश मढवई, कैलास मढवई, हरीओम मढवई, नितीन मढवई, ज्ञानेश्वर गुंजाळ, गोपाल खराटे, बापूसाहेब खटाणे, शिवाजी निमसे, बाळू घोटेकर, किरण सुर्यवंशी आदींसह सकल मराठा समाजाचे तरुण उपस्थित होते.

प्रास्ताविक राजेंद्र घोटेकर यांनी केले. यावेळी अर्जुन मढवई, रवींद्र गुंजाळ, प्रमोद पाटील, बाबासाहेब खराटे, नंदू घोटेकर, सुकदेव मढवई यांनी मनोगत व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचा सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा असल्याचे माजी सरपंच रवींद्र गुंजाळ यांनी यावेळी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -