Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली

मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली

मुंबई : राज्यासह मुंबईतून नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा परिणाम तापमानावर होताना दिसत आहे. मान्सूनमुळे एकीकडे मुंबईसह राज्यात काही ठिकाणी तापमान वाढल्याचे पाहायला मिळत असताना हवेची गुणवत्ता खालवली असल्याचे समोर आले आहे.

मुंबईती हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीतून मध्यम श्रेणीत घसरली आहे. मुंबईतील एकूण एक्यूआय हवा गुणवत्ता निर्देशांक खालवला आहे. माझगाव, कुलाबा आणि नवी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत पोहोचली आहे.

कुलाब्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक २९४ वर, माझगावात हवा गुणवत्ता निर्देशांक निर्देशांक २०६ वर तर नवी मुंबईतील एक्यूआय २१४ वर आहे. कुलाबा, माझगाव आणि नवी मुंबईत पीएम २.५ कणांची मात्रा अधिक आहे. माझगाव परिसरातील आणि कुलाबा परिसरात समुद्री वाहतूक, जड वाहनांच्या वाहतुकीमुळे परिणाम तर बांधकाम आणि धुळीच्या कणांमुळे मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे, मुंबई पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.

अंधेरी एक्यूआय १२५ वर, चेंबूर परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १५६, बीकेसीतील एक्यूआय १०६, बोरीवलीतील एक्यूआय ११२ वर घसरला आहे. तसेच, वरळी आणि भांडूप परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक स्थितीत आहे.

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमानात वाढ होणार आहे. देशभरात ऑक्टोबर महिन्यात ‘उष्णतेची लाट’ येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, ऑक्टोबर हिटचे चटके बसणार आहेत, अशी शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

हवेची गुणवत्ता म्हणजे काय?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक्यूआय ०-५० मधील चांगले, ५१ आणि १०० मधील समाधानकारक, १०१ आणि २०० दरम्यान मध्यम, २०१ आणि ३०० दरम्यान असमाधानकारक, ३०१ ते ४०० मधील अत्यंत असमाधानकारक आणि ४०० पेक्षा जास्त गंभीर म्हणून वर्गीकृत केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -