तुमच्या उत्तुंग भरारीपुढे…

Share

मेघा गांगण

तुमच्या उत्तुंग भरारीपुढे,
गगनही ठेंगणे असावे…
तुमच्या विशाल पंखाखाली,
विश्व ते सारे विसावे…!

माझा आणि वहिनींचा परिचय गेल्या १५ वर्षांचा. सुरुवातीला महसूल मंत्र्यांची पत्नी आणि एक कुटुंबवत्सल गृहिणी वाटणाऱ्या वहिनीसाहेबांचा जसजसा सहवास वाढला तसतसा त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा उलगडा होत गेला.

खरं तर कुटुंबप्रमुख म्हणून घरातल्या कर्तव्यदक्ष पुरुषाकडे पाहिले जाते. इथे तर घरातली सर्व पुरुष मंडळी कर्तव्यदक्ष, जबाबदार, मंत्री, खासदार, आमदार पण सर्वांवर वर्चस्व मात्र वहिनीसाहेबांचे. सुरुवातीला मला खूप आश्चर्य वाटायचं जेव्हा खासदार असलेले निलेशसाहेब आणि आमदार असलेले नितेशसाहेब नेहमी घराबाहेर पडताना दादा आणि वहिनींच्या पाया पडत आणि आपला दौरा सांगत. दिवसभरातून डायनिंगवर एकवेळ घरातील सर्व सदस्यांनी जेवण करावं हा वहिनींचा शिरस्ता. यातून दोन गोष्टी साध्य करता येत असाव्यात. एक तर सर्व कुटुंब एकत्र बांधून ठेवणं आणि घरातल्या सदस्यांच्या कामाचा आढावा. या सर्वांमधून वहिनींनी मुलांवर केलेले संस्कार आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर असलेली माया दिसून येते.

परवा वहिनींशी गप्पा मारताना त्या आपली बहीण (लती मावशी) किंवा जाऊबाई विणा यांच्याबद्दल खूप काळजीयुक्त बोलतात, तेव्हा सासर-माहेर दोन्ही घरे कशी जपून ठेवावीत, हे शिकता येते. आंबोलीचे सरपंच पालयेकर गेले तेव्हा वहिनींना व्यक्त केलेल्या भावना पाहून प्रत्येक कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनातली आस्था दिसून येते. हल्ली दोन-तीन वर्षे दिल्ली रहिवासी असल्याने जिल्ह्यातील माणसं दिल्लीत गेल्यावर वहिनींचा चेहरा आनंदाने फुलतो. वहिनी सगळ्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची आस्थेने चौकशी करतात. जुन्या आठवणी आठवताना मनमुराद हसणाऱ्या वहिनींचा कटू आठवणींनी हळवा होणारा स्वर व ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा अलगद टिपणाऱ्या वहिनी पाहिल्या.

२० मे १९७९ ला दबंग व्यक्तिमत्त्व असलेल्या राणेसाहेबांबरोबर या करुणा, वात्सल्यमूर्तीचा विवाह झाल्यानंतर गेल्या ४३ वर्षांचा आयुष्याचा प्रवास किती खडतरपणे पार पडला, तप्त सूर्यकिरणांचा मारा होता की, हिमबर्फकणांचा शिडकाव होता? काटेरी रस्ता होता की, गुलाबपाकळ्या पसरलेल्या पाऊलवाटा होत्या? हे केवळ वहिनीच जाणे. याबद्दल विचारलं तरी वहिनी हसून म्हणतात, ‘त्याबद्दल काही विचारू नको बाई…’

साहेबांची सिंधुदुर्गाप्रती अनेक स्वप्ने आणि ती पूर्ण करताना होणारी वहिनींची धावपळ. म्हणजे सुरुवातीला पेट्रोल पंप, दर्जेदार निलम कंट्रीसाइड, इंजिनीअर कॉलेज, उद्योग महिला भवन व आताचे मेडिकल कॉलेज… मला वाटतं नकळत यात ओढल्या गेलेल्या वहिनींनाही कळलं नसेल की, एका गृहिणीचे उद्योजिकेमध्ये कधी रूपांतर झाले.

वहिनी म्हणतात, मी राजकारणी नाही, मला त्यातलं काही कळत नाही. पण साहेबांपासून माझ्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत राजकारणात एखाद्या अवघड प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी वहिनींची मदत घ्यावी लागते. वहिनी म्हणतात, ‘मला त्या शैक्षणिक क्षेत्रातले काही समजत नाही. पण इंजिनीअर कॉलेज आणि मेडिकल कॉलेजचा अवाढव्य व्याप वहिनी लीलया पेलवतात. पेट्रोल पंप, हॉटेल्स, महिला भवनमधले गृहउद्योग, मुंबईमधील अद्ययावत ब्यूटिपार्लर आणि अज्ञात असलेल्या अनेक व्यवसायांची धुरा वहिनीसाहेबच सांभाळतात. व्यवसाय करायला किंवा सांभाळायला पदवीधर किंवा उच्चशिक्षित पाहिजे, यावर वहिनींनी फुलीच मारली जणू. साहेबांच्या आजवरच्या यशस्वी कारकिर्दीमागच्या खऱ्या सूत्रधार वहिनीसाहेबच. साहेबांचा दिवस सुरू झाल्यापासून संपेपर्यंत वहिनी सावलीसारख्या त्यांच्याबरोबर असतात. सहचारिणी, अर्धांगिनी, धर्मपत्नी या सगळ्याच व्याख्या वहिनींना तंतोतंत लागू पडतात.

वहिनींना टेंशनयुक्त काहीच आवडत नाही. एखादी नकारात्मक गोष्ट अथवा विचार त्या झटकन बाजूला करतात आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. अगदी गाणी ऐकतानासुद्धा संथ, सॅड आणि खूप जुनी गाणी त्यांना नाही आवडत. ८०-९० च्या काळातली किंवा अगदी अलीकडच्या काळातील उडती गाणी ऐकतात आणि नवोदित गायकदेखील त्यांना चांगले परिचित आहेत. चित्रपटदेखील धीरगंभीर किंवा मारमारीचा असेल, तर त्या टाळतात. कॉमेडी, कौटुंबिक चित्रपट आणि मालिकांबद्दल बरीच माहिती असते त्यांच्याकडे.

वहिनींमध्ये एक प्रचंड चिकित्सक लपलेला आहे. फळांची, साड्यांची किंवा कोणतीही वस्तू खरेदी करताना दिसणारा गुण राजकीय निर्णय घेतानाही दिसून येतो. एकंदरीत वहिनींचे व्यक्तिमत्त्व, त्यांचं रुबाबदार चालणं, साड्यांची निवड, त्यावर मॅचिंग अलंकार, हसरा चेहरा याची आमच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. वहिनींच्या दिनक्रमामध्ये देवभक्तीला अढळ स्थान आहे. मला तर वहिनींचं प्रेम विशेष लाभलं, असं वाटतं. काही प्रसंग, काही घटना घडल्या आणि वहिनींची माझ्याप्रती असलेली माया, जिव्हाळा आणि दृढ विश्वास मला जाणवला. दुःखद प्रसंगी वहिनींनी पाठीवरून फिरवलेला हात आईची माया देऊन गेला. या माऊलीला, माझ्या गुरुस्थानी असलेल्या वहिनीसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे, ही कुलदेवता वडचाईकडे प्रार्थना.

Recent Posts

RCB vs PBKS: बंगळुरुचा ‘विराट’ विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ…

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…

6 hours ago

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी एकाच मंचावर

महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…

8 hours ago

२०२४मध्ये अयोध्या, लक्षद्वीपला पर्यटकांची पसंती वाढली

मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…

8 hours ago

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नका या चुका, लक्ष्मी माता होईल नाराज

मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…

9 hours ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…

10 hours ago

पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार : एस जयशंकर

नवी दिल्ली : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिल्ली…

10 hours ago