Sunday, May 5, 2024
Homeअध्यात्मसर्व सुखाचे आगर

सर्व सुखाचे आगर

श्रीभालचंद्र ऊर्फ नागडे महाराज हे खरोखरच कोण? हे एक न सुटणारे महान कोडे आहे! त्यांचे भक्त आपापल्या बुद्धिप्रमाणे त्यांना अनेक अवतारात ओळखतात; परंतु त्यांचे विशेष आकर्षण हे आहे की, त्यांचे भक्त अनेक धर्मांचे, जातीचे आणि पंथाचे आहेत. त्यांच्याकडे परभाव नाही. ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘पाणी जसे गायी आणि वाघ पीत असतेवेळी आपला जीवनधर्म सोडत नाही तसेच वृक्ष जसा त्याला लावणारा आणि तोडणारा या दोघांवरही छाया सारखीच करतो.’ तद्वतच श्रीभालचंद्र महाराज त्यांचा भक्त मग तो कोणत्या धर्माचा नि पंथाचा असो किंवा त्यांना त्यावेळी लाथा मारणारा असो, त्यांना दुजेपण माहीत नाही. ते सदा गंगेसारखे पवित्र व हिमालयासारखे विशाल होते! सागरासारखे अथांग व आभाळासारखे असीम होते!! त्यांच्या थोरवीबद्दल लिहायचे तेवढे थोडेच आहे. किती लिहिले तरी शब्द अपुरेच पडतात. वास्तविक भालचंद्र म्हणजे गणपती. संत रामदास म्हणतात, ‘मुळारंभही तोच आणि आरंभही तोच!’ तुकोबा म्हणतात, ‘चंदनाचे हातही चंदन आणि पायही चंदन’ अशी थोर योग्यता बाबांची आहे. ते ब्रह्मानंदी टाळी लागलेले परब्रह्म आहेत! तरी अशा त्या थोर योगमार्तंडाच्या आणि योगियांच्या चरणी अनंत कोटी प्रणिपात असोत!

राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -