Friday, May 3, 2024
HomeदेशINDIA : इंडिया आघाडीत पुन्हा वाद? हरयाणामध्ये आपची एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा

INDIA : इंडिया आघाडीत पुन्हा वाद? हरयाणामध्ये आपची एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा

नवी दिल्ली : इंडिया (india) आघाडीत पुन्हा वाद निर्माण झाल्याची चिन्हे दिसत आहेत. असे यासाठी कारण आम आदमी पक्षाने हरयाणा विधानसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याची घोषणा केली आहे. आपचे संघटन महासचिव संदीप पाठक यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष विधानसभा निवडणूक एकट्यानेच लढणार आहे आणि ते अन्य कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत.

संदीप पाठक म्हणाले, हरयाणामध्ये विधानसभा निवडणुका येत आहे आणि आम आदमी पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे. सर्व राज्यांमध्ये आम्ही संघटना निर्माण करत आहोत. हरयाणामध्ये सर्कल लेव्हलपर्यंत आमचे संघटन बनले आहे. १५ दिवसांत हरयाणाच्या एक एक गावांत आमची कमिटी बनणार आहे. त्यानंतर आम्ही आमचे कँपेन सुरू करू. हरयाणाच्या जनतेला बदल हवा आहे.

१३ सप्टेंबरला होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या कॉर्डिनेशन कमिटीच्या बैठकीबाबत संदीप पाठक म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत जी पार्टनरशिप झाली त्याच्याशी संबंधित मीटिंग उद्या आहे. सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. काय अजेंडा असणार आहे याची आयडिया नाही मात्र उमेदवार निवडीपासून ते कँपेन प्लानिंग यावर चर्चा होईल.

सध्या इंडिया आघाडीत जागा वाटपाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा लवकर सोडवण्याबाबत सहमती झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -