Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिककोलाजDha Lekacaha : पंढरपुरात रंगला ‘ढ लेकाचा’च्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा

Dha Lekacaha : पंढरपुरात रंगला ‘ढ लेकाचा’च्या पोस्टर प्रदर्शनाचा सोहळा

  • ऐकलंत का! : दीपक परब

सध्या सगळीकडे आषाढी वारीचे मंगलमय वातावरण आहे. वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत आहे. आपल्या लाडक्या विठूरायासाठी वारी करणाऱ्या भक्तांच्या आणि अगदी सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा महिमा अपरंपार आहे. विठ्ठलाप्रमाणेच सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाल्याचा खडतर प्रवास ‘ढ लेकाचा’ या चित्रपटातून येत्या २६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीवर येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर पंढरपुरातील प्रसिद्ध विठ्ठलाच्या मंदिरात प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले. अत्यंत निरागस भाव असलेले हे लोभस पोस्टर पाहताच चित्रपटाच्या कथाविश्वाची कल्पना येते. पोस्टरवरील नवोदित बाल कलाकार आयुष उलागड्डेच्या चेहऱ्यावरील विलक्षण भावमुद्राभिनय पाहून रसिक प्रेक्षकांना ‘ढ लेकाचा’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. आषाढीच्या अगदी दोन दिवस अगोदर ‘ढ लेकाचा’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याने संपूर्ण वारकरी संप्रदायासोबतच महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांसाठी आपल्या प्रिय विठुरायाचा हा प्रसादच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

दिग्दर्शक जोगेश्वर ढोबळे दिग्दर्शित ‘ढ लेकाचा’ या चित्रपटाची कथा भाल्या या तरुण मुलाभोवती फिरते, भाल्याच्या शाळेत शिकत असणाऱ्या विक्की देशमुख या विद्यार्थ्याला असलेल्या पैशाच्या माजामुळे गुंडगिरीचा सामना करत तसेच शाळेतील शिक्षणप्रणालीच्या अडचणींना तोंड देत शालेय जीवनात संघर्ष करावा लागतो. भाल्याचे व त्याचे वडील आणि पाळीव बकरी बादशाहसोबत एक भावनिक नाते तयार होताना दिसत आहे. आपल्या मुलाच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक परिश्रम करत असताना भाल्या आणि त्याचे वडील सदा लोहार यांच्यातील नात्याचे सुंदर चित्रिकरण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटात बाल कलाकार आयुष उलागड्डे सोबतच अतुल महेल, मुकुंद वसुले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना एक वेगळीच पर्वणी यातून पाहायला मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -