Sunday, May 5, 2024
Homeकोकणरत्नागिरीleopard : विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या काढले बाहेर

leopard : विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या काढले बाहेर

वन विभागाची ग्रामस्थांसमवेत मोहीम

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील तनाळी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला (leopard) वन विभागाच्या बचाव पथकाने सुखरूपपणे बाहेर कढून नैसर्गिक आधिवासात सोडले आहे. ही घटना शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी घडली.

तनाळी गावातील मराठवाडी येथील संदीप लाड यांच्या विहिरीमध्ये शनिवारी सकाळी ८ वाजता पाणी भरण्यासाठी गेलेल्या पार्वती लाड यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले. याची माहिती त्यांनी संदीप लाड व उदय जाधव यांना दिली. यानंतर जाधव यांनी ही माहिती तत्काळ वनविभागास कळविली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिपळूण परिक्षेत्र वनाधिकारी राजेश्री कीर या वन विभागाच्या बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर काही वेळातच बिबट्यास सुरक्षितरीत्या बाहेर काढले. विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पाहणी केली असता त्यांनी हा बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे अंदाजे वय ५ वर्षे असून तो सुस्थितीत आहे. त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याबाबत संदर्भातील अहवाल दिला. यानुसार वनविभागाच्या बचाव पथकाने या बिबट्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

वनविभागाचे बचाव पथकामध्ये परिक्षेत्र वनाधिकारी राजेश्री कीर, वनपरिमंडळ अधिकारी दौलत भोसले, वनरक्षक दत्ताराम सुर्वे, वनरक्षक राहुल गुंठे, वनरक्षक राजाराम शिंदे व वाहनचालक नंदकुमार कदम यांनी बिबट्याला केवळ अर्ध्या तासामध्येच स्थानिक व ग्रामास्थांच्या मदतीने बाहेर काढले. या बचाव पथकास विभागीय वनअधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांनी मार्गदर्शन केले. मानवी वस्तीत बिबट्या आढळून आल्यास किंवा संकटात सापडल्यास त्याबाबतची माहिती वनविभागास कळविण्याबाबत वनविभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण राजेश्री कीर ८६०५४५८५८५ या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -