Monday, April 28, 2025
Homeक्रीडाIPL 2025DC vs RCB, IPL 2025: सामना अव्वल स्थानासाठी

DC vs RCB, IPL 2025: सामना अव्वल स्थानासाठी

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली कॅपिटल व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर अव्वल पदासाठी एकमेका विरुद्ध लढणार आहेत. दोन्ही संघ गुण तक्त्यात १२ गुणासह अव्वल स्थानी आहेत. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो १४ गुणासह अव्वल स्थानी विराजमान होईल. दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी ठरत आहेत. अरुण जेटली स्टेडियम हे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे पण नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी करेल कारण दुसऱ्या सत्रात या मैदानावर दव पडते त्यामुळे गोलंदाजी करणे कठीण होते.

दोन्ही संघाचे फलंदाज फॉर्म मध्ये असल्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. या अगोदरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६ विकेटने पराभव केला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू नक्कीच आज त्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल.

आज दिल्लीची गोलंदाजी कशी होणार यावर दिल्लीचे भवितव्य अवलंबून आहे. मिचेल स्टार्कने सुरुवातीलाच बेंगळुरूच्या फलंदाजाना बाद केले तर चित्र काही वेगळेच असेल. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सहजा सहजी हार मानणार नाही. ते सुरुवाती पासूनच आक्रमक खेळतील. दिल्लीची फिरकी अरुण जेटली मैदानावर काय पराक्रम दाखवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अरुण जेटली मैदानावर कोण सर्वोत्तम खेळ करते ते पाहूच आपण.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -