Thursday, April 24, 2025
Homeदेशउधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आणि प्रमुख रस्त्यांवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नागरिकांची आणि त्यांच्या सामानाची, वाहनांची तपासणी सुरू झाली. यानंतर काही तासांतच बारामुला येथे झालेल्या चकमकीत दोन पाकिस्तानमधून आलेल्या घुसखोरांना ठार करण्यात आले. बारामुला चकमकीला २४ तास उलटत नाहीत तोच उधमपूर येथे तीन ते चार अतिरेकी लपल्याची माहिती सुरक्षा पथकांना मिळाली. यानंतर तातडीने कारवाई सुरू करण्यात आली. सध्या उधमपूर येथे सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे.

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

पूँछमध्ये लसाना येथील घनदाट जंगलात अतिरेक्यांच्या विरोधात रोमियो फोर्सने स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपसोबत संयुक्त कारवाई सुरू ठेवली आहे. ही कारवाई १५ एप्रिलपासून सुरू आहे. घनदाट जंगलात शोधून अतिरेक्यांना ठार केले जात आहे.

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. अटारी सीमेवरुन भारत – पाकिस्तान दरम्यानचे येणे – जाणे बंद केले आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना अती दक्षतेचा इशारा दिला आहे. या पाठोपाठ केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले आहे.लवकरच पाकिस्तानशी संबंधित अनेक सोशल मीडिया अकाउंट भारतात ब्लॉक होणार असल्याचे वृत्त आहे. याआधी जुलै २०२२, ऑक्टोबर २०२२ आणि मार्च २०२३ मर्यादीत काळासाठी केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -