मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले आहेत. त्यांच्याकडे एक चांगला फिनिशर नाही आहे जो संघाला शेवटच्या षटकात हाणामारी करून जिंकून देऊ शकतो. ध्रुव जुरेल व हेटमायर हे चांगले हिटर आहेत परंतु आवेश खानच्या यॉर्कर चेंडूंवर त्याना खेळता आले नाही. संजू सॅमसन आजच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नाही त्यामुळे राजस्थानला सलामीची चिंता तर असणारच.
वैभव सूर्यवंशी गेल्या सामन्यात चांगला खेळला आहे तो सलामीला खेळू शकतो. राजस्थानचा कर्णधार रियान परागला गोलंदाजीमध्ये खेळपट्टीप्रमाणे बदल करावे लागतील. मुळात २०-२० चा खेळ हा तुम्ही किती धोका पत्करता यावर तुमचा विजय अवलंबून असतो. जर खेळपट्टी फिरकीला साथ देत असेल तर सुरुवातीची षटके फिरकीचा मारा करणे फायद्याचे ठरेल. बेंगळुरूचा संघ त्यांचा नैसर्गिक खेळ खेळेल, सुरुवातीपासूनच त्यांनी आक्रमक खेळ केला आहे त्यामुळे आजही ते मैदानावर त्याच निर्धाराने उतरतील.
आयपीएलचा अठरावा हंगाम आता रंजक वळणावर आला असताना प्रत्येक संघाची विजय मिळविण्यासाठी धडपड सुरु आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सुध्दा आज विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. आज जर ते जिंकले नाहीत तर ते गुण तक्त्यात खालच्या स्थानावर घसरतील.
चला तर बघूया राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पैकी कोणता संघ बाजी मारतो.