Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे पाणीपुरवठाविषयक विविध कामे हाती घण्यात येणार आहेत. ही कामे शनिवार २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून रविवार २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहेत. पामुळे घाटकोपर, विद्याविहार एन आणि कुर्ला, टिळकनगर या एल विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून रविवार २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापर्यंत बंद राहणार आहे.

संबंधित परिसरातील नागरिकांनी, पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पाणीपुरवठाविषयक नियोजित विविध कामांमध्ये (पश्चिम) येथे संत तुकाराम पुलाजवळ १५०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर १२०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे, घाटकोपर उच्वस्तर जलाशयाच्या इनलेटवर १४०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे, ०४ छेद जोडणी (क्रॉस कनेक्शन), १२०० मिलीमीटर X ६०० मिलीमीटर, १५०० मिलीमीटर x ६०० मिलीमीटर, १५०० मिलीमीटर x ३०० मिलीमीटर (०२) व १५०० मिलीमीटर तसेच ९०० मिलीमीटर व्यासाच्या दोन जलवाहिन्यांची गळती दुरुस्ती आदींचा समावेश आहे.

एन विभाग: भटवाडी, बर्वेनगर, महानगरपालिका वसाहत-ए ते के, काजूटेकडी, रामजी नगर, राम जोशी मार्ग, आझाद नगर, अकवरलाला कपाऊड, पारसीवाडी, सोनिया गांधी नगर, नामदार बाळासाहेब देसाई वसाहत (शनिवार दिनांक २६ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद) आनदगड शोषण टाकी व उदचन केंद्रावरून पाणीपुरवठा होणारा विभाग, शंकर मंदिर, राम नगर, हनुमान मंदिर, राहूल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, रामनगर शोषण टाकी व उदधन केंद्रावरुन पाणीपुरवठा होणारा विभाग, डी अँड सी महानगरपालिका वसाहत, रायगड विभाग, विक्रोळी पार्क साईटचा काही भाग, सुभाष नगर, शिवाजी नगर, यशवंत नगर, औद्योगिक वसाहत रस्ता, गावदेवी, पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर-१, अमिनाबाई चाळ आणि साईनाथ नगरचा काही भाग, गणेश नगर, सागर पार्क, जगदूशा नगर, मौलाना संकुल, काकडीपाडा, भीमनगर, इंदिरा नगर-२, अल्ताफनगर, गेल्डा नगर, मोळीबार मार्ग, सेवानगर, ऑईल अँड नॅचरल गॅस कॉरिशन (ओ. एन. जी. सी.) वसाहत, माझगाव डॉक कॉलनी, अमृतनगर आसपासचा परिसर, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक २, सिद्धार्थ नगर आणि आंबेडकर नगर, जवाहरभाई प्लॉट, सुरका नगर, नवीन दयासागर, पाटीदार वाडीचा काही भाग, राधाकृष्ण हॉटेलया मागील भाग, गंगावाडी परिसराचा काही भाग. (शनिवार २६ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद)

एल विभाग असल्फा नाय, एन. एस. एस. मार्ग, होमगार्ड वसाहत, नारायण नगर, साने गुरुजी उदयन केंद्र, हिल नंबर ३. अशोक नगर, हिमालय सोसायटी, संजय नगर, समता नगर, गैवण शाह वाया दर्गा मार्ग. (शनिवार दिनांक २६ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद) संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एन. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदिर मार्ग, कुलकर्णी वाडी, मोहिली जलवाहिनी, भानुशाली वाडी, परेरा वाडी, (रविवारी २७एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -