मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले?
मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. अशातच आता स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत (Mumbai News) धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईत विक्रोळी येथे राहणाऱ्या एका महिलेची निघृणपणे हत्या करण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. नवरा सकाळी नाईट शिफ्टवरुन घरी येताच त्याच्या पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime)
Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत विक्रोळी पूर्व भागात सूरज निर्मल (३६) ही महिला तिच्या नवऱ्यासोबत राहत होती. नेहमीप्रमाणे मृत महिलेचा नवरा नाईट शिफ्टवरुन दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता घरी परतला. परंतु घरात प्रवेश करताच त्याला पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. यानंतर पतीने तातडीने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह श्वानपथक, फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या सर्व पथकांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. तसेच पोलिसांनी केलेल्या तपासात या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. सध्या विक्रोळी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास विक्रोळी पोलीस करत आहेत.
तंबाखू न दिल्याने तरुणाने घेतला मित्राचा जीव
मुंबईत एका तरुणाने मित्राकडे तंबाखू मागता नकार दिल्याने त्या रागात थेट मित्राचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी (१९ एप्रिल २०२५) कांदिवलीतील साईबाबानगर येथे असलेल्या दैवी इटर्निटी या निर्माणाधिन इमारतीमध्ये ही घटना घडली. जितेंद्र आणि अफसर हे दोघे या इमारतीमध्ये काम करत होते. सायंकाळी दिवसभराचे काम पूर्ण करुन हे दोघे मारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मोकळ्या जागेवर बसून फोनवर आयपीएल पाहत होते. यावेळी आरोपी अफसरने जितेंद्रकडे तंबाखू मागितली. पण त्याने तंबाखू देण्यास नकार दिला. त्याचा अफसरला राग आला. त्यानंतर रात्री १० वाजता जितेंद्र फोनवर मोठ्याने बोलत होता. त्यामुळे अफसर चिडला. अफसरने जितेंद्रला जरा हळू बोल असे सांगितले. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. इतर कामगारांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला. पण काही वेळात हा वाद विकोपाला गेला असून दुसऱ्या मजल्याच्या कडेला उभ्या राहिलेल्या जितेंद्रच्या दिशेने जाऊन अफसरने त्याला ढकलून दिले. (Mumbai Crime)
दरम्यान, ही घटना घडताच पीडित तरुण जितेंद्रला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषीत केले. तसेच या घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी अफसरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.