Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीपंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचे काऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून २२-२३ एप्रिल रोजी सौदी अरेबियाला भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसऱ्या काळातील देशातील पहिला दौरा असेल. यापूर्वी पंतप्रधान मोदी 2016 आणि 2019 मध्ये सौदीच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2023 मध्ये क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नवी दिल्लीच्या राजकीय भेटीनंतर पीएम मोदी सौदीच्या दौऱ्यावर जाणार आहे.

क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सप्टेंबर 2023 मध्ये G20 शिखर परिषदेला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या पहिल्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले होते.

परराष्ट्र मंत्रालयाने एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, धोरणात्मक भागीदार म्हणून, दोन्ही देश राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रात मजबूत द्विपक्षीय संबंध सामायिक करतात. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध ऐतिहासिक आहे.

दोन्ही देशात 2020 मध्ये भारत-सौदी अरेबियामधील व्यावसायिक संबंध भागीदारीच्या पातळीवर पोहोचले होते. सौदी अरेबीयामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय कामगार काम करत आहे. तसेच सौदी हा भारताचा पाचवा सर्वात मोठा व्यापारी देश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -