भिवंडी : राज्यभरात उन्हाचा कडाका (Summer Heat) वाढत चालला असून उन्हाच्या वाढत्या झळांसह नागरिकांना पाण्याची गरज भासत आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात भिवंडी शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी स्टेम कंपनीची मुख्य जलवहिनी तुटल्यामुळे पाणी पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे भिवंडीत पुढील दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील नागरिकांना सुचना देण्यात येत आहे की भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी स्टेम कंपनीची मुख्य जलवहिनी कल्याण सापड गाव येथे तुटल्याने भिवंडी शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नागरिकांना शनिवार (दि. १८) व रविवार (दि.१९) असे २४ तास पाणी पुरवठा होणार नाही.
RBI Action : ३ बड्या बँकांवर आरबीआयची धडक कारवाई! ग्राहकांवर होणार परिणाम?
दरम्यान, पाईप लाईन दुरुस्त झाल्यावर भिवंडी शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे,कार्यकारी अभियंता,भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.