Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीजळगाव : दुर्गम भागात आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

जळगाव : दुर्गम भागात आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

जळगाव : सातपुडा पर्वताच्या यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाड्या जामन्या आदिवासी या वस्तीच्या भागातून धक्कादायक माहीती समोर येत आहे. या ठिकाणी एका ३० ते ४० वर्ष वयोगटातील महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटने संदर्भात यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे दरम्यान महिलेचा मृत्यू सशस्पद असल्याने घातपात झाल्याची शक्यता येत आहे.

या संदर्भात विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाडऱ्या जामन्या या ठीकाणी निळकंठ कुटिया जवळ कोरडया तलाव असून, या क्षेत्रातुन वन विभागाचे कर्मचारी जात असतांना त्यांना तलावात अनोळखी अंदाजे ३० ते ४० वर्षीय माहिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसुन आला.

Simple Tricks For Pimple : आंबा खाल्ल्यावर चेहऱ्यावर पिंपल्स येतात? मग ‘या’ टिप्स आहेत बेस्ट

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तात्काळ दखल घेत आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, या अनोळखी महीलेचा मृत्यु कशामुळे झाला याची माहिती अधा अद्यापपर्यंत समोर आलेली नाही, प्राथमिक माहितीनुसार महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मरण पावलेल्या महिलेचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेत, प्रथमदर्शनी महीलेचा मृत्यु संशयास्पद वाटल्याने तिचा मृतदेह हा यावलहून जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपस सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -