Saturday, April 19, 2025
Homeदेशशेणाने सारवून गारवा? दिल्लीत प्राचार्यांचा प्रयोग फसला! नक्की काय झालं?

शेणाने सारवून गारवा? दिल्लीत प्राचार्यांचा प्रयोग फसला! नक्की काय झालं?

नवी दिल्ली : दिल्लीत उष्णतेने होरपळलेल्या विद्यापीठाच्या वर्गखोल्यांमध्ये गारवा निर्माण करण्यासाठी दिल्ली विद्यापीठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एक अनोखा आणि पारंपरिक प्रयोग केला. त्यांनी स्वतः आपल्या हातांनी वर्गाच्या भिंतींवर गायीचे शेण लावले. हा भारतीय पारंपरिक पद्धतीवर आधारित उपाय असून तो घरात थंडावा निर्माण करतो, असा संदेश त्यांनी व्हॉट्सअप मेसेजमध्ये वाचला होता. त्याची अमलबजावणी त्यांनी केली. त्याचा विडिओ चांगलाच व्हायरल झाला.

मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आधुनिक काँक्रीट आणि सिमेंटच्या इमारतींमध्ये अशा उपायांना फारसा उपयोग नाही. मातीच्या भिंती असतील तर ठीक आहे. गायीच्या शेणामध्ये थंडावा निर्माण करण्याची क्षमता मर्यादित असते. परंतु काँक्रीट आणि सिमेंटच्या इमारतींमध्ये तो पंखा किंवा कूलरचा पर्याय होऊ शकत नाही. विशेषतः लक्ष्मीबाई कॉलेजमधील ज्या जुन्या इमारतींमध्ये वर्ग आहेत, तिथे हवेशीरपणा कमी आहे, वर्ग मोठे आहेत आणि पंखेही अपुरे आहेत. अशा ठिकाणी गायीच्या शेणाचे लेप कामाचे नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

ATM in Train : पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएमची सुविधा, रेल्वेचा अभिनव प्रयोग

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी स्पष्टपणे सांगितले की खरी समस्या म्हणजे इमारतींच्या दुरवस्थेकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले गेले आहे. अनेक वर्ग अतिप्रवेशित आहेत, क्रॉस व्हेंटिलेशन नाही, आणि कार्यरत पंख्यांची संख्याही खूपच कमी आहे. कूलर किंवा एसी तर दूरच. शौचालयांची अवस्था देखील अत्यंत खराब आहे.

दरम्यान, हे आमच्या संशोधन प्रस्तावाचा भाग आहे, असे प्राचार्यांनी सांगितले. पण विद्यार्थ्यांच्या मते, यामुळे काहीही फरक पडलेला नाही. एका विद्यार्थ्याने म्हटले, “काही वर्ग खरेच खूप गरम आहेत, पण कोणी गायीच्या शेणाची मागणी केली नव्हती. आम्हाला फक्त नीट चालणारे पंखे किंवा कमीत कमी कूलर हवेत.

या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये प्राचार्य वत्सला आणि काही कर्मचारी भिंतींवर गायीचे शेण फासून सारवताना दिसतात. हे ब्लॉक सी मध्ये करण्यात आले आहे, जे कॉलेजमधील सर्वात जुने आणि उन्हाळ्यात सर्वाधिक उष्णता जाणवते, अशी ही बिल्डिंग आहे.

कॉलेजमध्ये नुकतेच कुलगुरू योगेश सिंग यांच्या हस्ते नवीन ब्लॉकची पायाभरणी करण्यात आली. पण जुन्या इमारतींची अवस्था मात्र जसेच्या तशी राहिली आहे. हेच दुहेरी धोरण विद्यार्थ्यांच्या नाराजीचे मूळ कारण ठरत आहे.

गायीच्या शेणाने गारवा मिळवण्याच्या या प्रयत्नामुळे टिकावू, पर्यावरणपूरकता आणि नवकल्पनांबाबत चर्चा रंगली असली, तरी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा तात्पुरत्या कृतींपेक्षा खऱ्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. गायीचे शेण नव्हे, तर पंखे आणि कूलरच खरी गरज भागवू शकतात!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -