मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचे मैदान फलंदाजीला अनुकूल आहे त्यामुळे दोन्ही संघाना जास्त धावा करण्याची संधी आहे. दिल्लीने आता पर्यंत या मैदानावर मुंबई विरुद्धचा सामना वगळता सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे दिल्लीचे पारडे नक्कीच राजस्थान रॉयल्स समोर जड आहे.
दिल्लीची फलंदाजी पाहता दिल्लीसाठी मोठी धावसंख्या उभारणे सहज शक्य आहे. दिल्लीला जोफ्रा आर्चरचा सुरवातीच्या स्पेल पासून सावध राहावे लागले. जोफ्रा आर्चर सुरवातीला इनस्विंगर मारतो त्यामुळे चेंडू झटकन आत घुसतो व त्रिफळा उडतो. गेल्या सामन्यातील पराजयामुळे दिल्लीला हा सामना संयमाने खेळावा लागेल, चुका कमी कराव्या लागतील. राजस्थानसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. लागोपाठ दोन सामने गमावल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचले आहे. अशावेळी आक्रमकपणे उत्तर देणे गरजेचे आहे. संजू सॅमसंगला कर्णधारपदाची भुमिका बजवावी लागेल तर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग ह्यांना आज मोठ्या धावसंखेचे उद्दिष्ट साध्य करावे लागेल.
गोलंदाजीमध्ये दोन्ही संघ एकमेकाला पूरक आहेत, तरीही फिरकीमध्ये दिल्लीचा संघ राजस्थान पेक्षा दोन पाऊले पुढेच आहे. कुलदीप आणि विपराज ह्या दोंघाची फिरकी दिल्लीच्या मैदानावर खेळून काढणे कठीणच आहे.
चला तर बघूया दिल्ली राजस्थानला रोखू शकते का?