नाशिक : लांबाचा प्रवास करायचा म्हटला की अनेकजण रेल्वे प्रवासाला (Railway travel) पहिली पसंती देतात. लांब पल्ल्याडचा रेल्वे प्रवास दिड-दोन दिवसांचा देखील होतो. मात्र अनेकदा या प्रवासात घाईगडबडीत पैसे घेण्याचा विसर पडतो. तर कधी पाकिट चोरी देखील होतात. अशावेळी प्रवासादरम्यान पैशांची अडचण निर्माण होत असते. मात्र प्रवाशांची ही अडचण आता दूर होणार आहे. आता रेल्वेत एटीएम मशीनची सुविधा करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान पैशांची अडचण भासल्यास प्रवाशांना ही सुविधा सोयीची ठरणार आहे. (ATM In Railway)
Alka Kubal : २७ वर्षानंतर अलका कुबल यांचा कमबॅक! रंगभूमीवर केली ‘वजनदार’ एन्ट्री
मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड- मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये ही सुविधा महाराष्ट्र बँकतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. रेल्वेत एका बोगीच्या रिकाम्या जागेमध्ये हे एटीएम उभारण्यात आले आहे. हे मशीन सुरक्षित राहण्यासाठी याला शटर देखील लावण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रवासात ज्याला पैशांची गरज आहे, तो वेळीच रक्कम काढू शकणार आहे. हे एटीएम जीपीएस आधारित असेल. यामुळे बहुतेक वेळा एटीएममध्ये नेटवर्क कव्हरेज सुनिश्चित होईल. यासाठी प्रवाशांना कोणताही अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही. दरम्यान, या एटीएमची सुरक्षा ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या गार्डची जबाबदारी असेल. (ATM In Railway)
ATM in Train
Good initiative by @Central_Railway @rajtoday pic.twitter.com/UWNw1p734a— The Other Side Of Horizon (@mystiquememoir) April 15, 2025
एटीएम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
रेल्वे प्रवासादरम्यान अनेक चोरीच्या घटना घडतात. गर्दीचा फायदा घेत तसेच खिडकीतून हात टाकून फोन चोरीच्या घटना रेल्वे प्रवासात सर्रास घडतात. त्यामुळे आता प्रवाशांच्या सोयीसाठी लावलेले एटीएम मशीनबाबतही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. (ATM In Railway)