मुंबई(ज्ञानेश सावंत): पंजाब संघाचा या अगोदरच्या सामन्यात दारुण पराभव झाला. सनरायझर्स हैदराबादने जणू मागील चार सामन्यातील पराभवाचा वचपा काढला. अभिषेक शर्माची फलंदाजी पाहून चाहते खुश झाले. आज पंजाबचा संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहे. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी त्याना आजच्या सामन्यात जोरदार प्रयत्न करावे लागतील.
आजचा सामना यदविंद्र सिंग इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे जे फलंदाज व गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त आहे. फलंदाजीमध्ये बरोबरी करायची झाली तर पंजाबचा संघ हा कोलकत्तापेक्षा सरस आहे. पंजाबचे आघाडीचे सर्वच फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. ह्या हंगामातील पंजाबचा रेकॉर्ड आहे त्यांनी पहिली फलंदाजी करताना नेहमीच २०० चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आजही त्यांचा तोच प्रयत्न राहील. परंतु जर कोलकत्त्याने सुरवातीला फलंदाजी घेऊन २२०-२३० धावा केल्या तर पंजाबला कठीण जाऊ शकते कारण धावांचा पाठलाग करताना पंजाबने ह्या अगोदर एक सामना गमावला आहे.
कोलकत्ता आजच्या सामन्यात गोलंदाजाचा योग्य वापर करून पंजाबला कमी धावा मध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल. कोलकत्त्याची गोलंदाजीची धार ही नक्कीच पंजाब पेक्षा चांगली आहे. पंजाब साठी कोलकत्ताची फिरकी खेळून काढणे सोपे नाही आहे त्यामुळे कोलकत्ताही पंजाबला सहज विजय मिळवून देणार नाही.
चंदिगडच्या या मैदानावर पंजाबचे फलंदाज वरचढ होतात की कोलकाताचे गोलंदाज हे पाहणे फारच रंजक ठरेल.