Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीगायिका सोनू कक्करचे 'सिबलिंग डिवोर्स' : बहीण नेहा आणि भाऊ टोनीशी तोडले...

गायिका सोनू कक्करचे ‘सिबलिंग डिवोर्स’ : बहीण नेहा आणि भाऊ टोनीशी तोडले नाते, पण का?

मुंबई : लोकप्रिय गायिका सोनू कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करत बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्करशी नातं तोडल्याचं सांगितलं. सोनूच्या या पोस्टने सर्वांनाच धक्का बसला आहे.

गायिका सोनू कक्करने पोस्ट मध्ये म्हटले आहे की, तुम्हाला कळवताना दुःख होत आहे की, यापुढे मी दोन टॅलेंटेड सुपरस्टार टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही. भावनिक वेदनांमधून मी हा निर्णय घेतला आहे आणि आज मी खरोखरच निराश आहे”,अशी पोस्ट केली. पण, काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली. पण तिच्या या पोस्टनंतर ‘सिबलिंग डिवोर्स’ हा शब्द चर्चेत आला आहे. पती-पत्नीमधील घटस्फोटाबद्दल सर्वांनी ऐकलंच आहे. पण, ‘सिबलिंग डिवोर्स’ काय आहे? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी काजूपासून बनवला ‘हा’ नवीन कोकणी पदार्थ

‘सिबलिंग डिवोर्स’ म्हणजे काय?

जेव्हा भावंडांमधील नाते बिघडते किंवा ते एकमेकांपासून भावनिकदृष्ट्या दूर जातात, तेव्हा हे भाव दर्शवण्यासाठी ‘सिबलिंग डिवोर्स’ ही संज्ञा वापरतात. ‘सिबलिंग डिवोर्स’ म्हणजे ज्यात भाऊ आणि बहिणींचे एकमेकांशी कोणतेही नाते नाही. हा कायदेशीर शब्द नाही. सोनू कक्करच्या पोस्टनंतर नेहा आणि टोन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या सगळ्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बहीण-भावांमध्ये नेमकं काय बिनसलंय?

दरम्यान बहीण-भावांमध्ये नेमकं काय बिनसलंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे. तर काहींनी सोनूचा अकाऊंट हॅक झाल्याचं म्हटलंय. सोनू कक्कर, टोनी कक्कर आणि नेहा कक्कर ही तिन्ही भावंड उत्तम गायक आहेत. नेहा आणि टोनी या दोघांसोबत तिने अनेक गाणी गायली आहेत. तर सोनू अनेक गायनाच्या रिअ‍ॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणून उपस्थित राहिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -