Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीRobert Vadra : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा पाठोपाठ...

Robert Vadra : सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा पाठोपाठ रॉबर्ट वाड्रालाही व्हायचंय खासदार

नवी दिल्ली : सोनिया गांधी राज्यसभेत तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा हे दोघे लोकसभेत खासदार आहेत. आता प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनाही खासदार व्हायचे वेध लागले आहेत. काँग्रेस पक्षाची इच्छा असेल आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर राजकारणात प्रवेश करणार, असे सूतोवाच रॉबर्ट वाड्रा यांनी केले. जर काँग्रेस पक्षाने निर्देश दिले तर राजकारणात सक्रिय होणार असल्याचे रॉबर्ट वाड्रा म्हणाले. संसदेत पोहोचण्यासाठी आवश्यक ते करण्याची तयारी आहे. पण काँग्रेस पक्षाची इच्छा असेल आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तरच राजकारणात प्रवेश करणार असे वक्तव्य रॉबर्ट वाड्रा यांनी केले.

Salman Khan : कार बॉम्बने उडवून देऊ, सलमान खानला आली नवी धमकी; पोलीस तपास सुरू

रॉबर्ट वाड्रा यांची पत्नी प्रियांका गांधी वाड्रा केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते तर मेहुणे राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच रॉबर्ट वाड्रा यांच्या सासूबाई सोनिया गांधी राजस्थानमधून काँग्रेस कोट्यातून राज्यसभेवर गेल्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले सर्व नातलग जनतेसाठी खूप काम करत असल्याचे .रॉबर्ट वाड्रा म्हणाले. त्यांनी नातलगांकडून खूप काही शिकत असल्याचे सांगितले. काही राजकारणी माझ्यावर आरोप करतात पण ते राजकीय हेतूने प्रेरित असेच आरोप आहेत; असे रॉबर्ट वाड्रा म्हणाले. त्यांनी मेहुल चोक्सीला परदेशात झालेल्या अटकेचे स्वागत केले. केंद्र सरकारने लवकरात लवकर चोक्सीला भारतात आणावे. चोक्सीवर भारतीय कायद्यानुसार कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी रॉबर्ट वाड्रा यांनी केली.

उद्धव गटात खैरे-दानवे वादामुळे दुफळी; दानवेंमुळे सगळे पक्ष सोडत असल्याचा खैरेंचा आरोप

रॉबर्ट वाड्रा २०२४ मध्ये अमेठीतून लोकसभेची निवडणूक लढणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण अखेरच्या क्षणी काँग्रेसने त्यांच्याऐवजी गांधी परिवाराचे विश्वासू आणि निष्ठावान कार्यकर्ते किशोरी लाल यांना संधी दिली. किशोरी लाल अमेठीतून लोकसभेची निवडणूक जिंकले आणि भाजपाच्या स्मृती इराणी यांचा पराभव झाला. किशोरी लाल यांना पाच लाख ३९ हजार २२८ तर स्मृती इराणी यांना तीन लाख ७२ हजार ०३२ मते मिळाली. यामुळे भविष्यात काँग्रेस रॉबर्ट वाड्रा यांचा खासदारकीसाठी विचार करणार का ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -