मुंबई : सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९ व १० एप्रिल रोजी ७८५ ग्रॅम वजनाचे व सुमारे ७.८५ कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले असून यासंदर्भात एका परदेशी प्रवाशाला अटक केली आहे. यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
९ एप्रिल रोजी यूआर ४३० या विमानाने प्रवास करुन मुंबईत आलेल्या एका परदेशी प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयावरुन रोखले होते. चौकशी करताना हा प्रवासी अस्वस्थ व चिंतीत झाल्याचे जाणवले. पुढील चौकशीत व वैद्यकीय तपासणीत प्रवाशाने पिवळ्या रंगाच्या भरपूर गोळ्या गिळल्याचे आढळून आले. या गोळ्यांमध्ये कोकेन असल्याचा संशय असलेला पांढऱ्या रंगाचा चुरगाळलेला पदार्थ होता.
वैद्यकीय देखरेखी अंतर्गत १३ एप्रिल रोजी केलेल्या पंचनाम्यात हा पदार्थ ७८५ ग्रॅम वजनाचे कोकेन असल्याचे सीमाशुल्क अधिकाऱ्यांना आढळले. त्याची अंदाजे किंमत ७,८५,००० रुपये इतकी आहे. या प्रवाशाला एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.