मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि आसपासची महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे दाखवणारी विशेष रेल्वे लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भातील माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची रेल्वे प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांसंदर्भात पत्रकार परिषद@Dev_Fadnavis @AshwiniVaishnaw#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai https://t.co/T0MYM7yxpS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2025
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार आहे. ज्यामध्ये सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे सुरू होईल. यामार्फत दहा दिवसांची टूर केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, जागा, त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळांना या रेल्वेद्वारे भेट देणे शक्य होणार आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Tahawwur Rana : तहव्वूर राणाची चौकशी सुरू, ‘या’ प्रश्नांची जाणून घेणार उत्तरं
विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गोंदिया – बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेकरीकरणाकरता ४ हजार ८१९ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. याचा फायदा विदर्भाला तसेच छत्तीसगड आणि तेलंगणालाही होणार आहे. केंद्र सरकार राज्यात रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरवर १ लाख ७३ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्टेशन्सच्या पुनर्विकासाचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांचं वर्ड क्लास ट्रान्स्फर्मेशन होतंय. यावर्षी २३ हजार ७०० कोटी रुपये रेल्वे बजेटमध्ये राज्याला मिळाले आहेत. यूपीएच्या दहा वर्षांमध्ये दहा हजार कोटी रुपये एकत्रितपणे मिळाले नाहीत. पण आता महाराष्ट्राला दरवर्षी २३ ते २५ हजार कोटी रुपये फक्त रेल्वेशी संबंधित योजनांकरिता मिळत आहेत.