Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीBelly fat: जिमला न जाता अशी कमी करा पोटाची चरबी, वापरा ही...

Belly fat: जिमला न जाता अशी कमी करा पोटाची चरबी, वापरा ही सोपी ट्रिक्स

मुंबई: पोटाची चरबी कमी कऱण्यासाठी अनेक उपाय आहेत. दरम्यान, यासाठी एक्सरसाईज गरजेची आहेत. मात्र ज्यांना जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करायची नाही आहे मात्र पोट कमी करायचे आहे तर अशा लोकांसाठी खाली काही पद्धती दिल्या आहेत. ज्यांनी तुम्ही पोट कमी करू शकता.

शुगर कमी करा – साखरेचे सेवन न केल्याने तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. साखरेचे कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी बिन साखरेचा चहा अथवा ब्लॅक कॉफी प्या. तसेच साखरेचे पदार्थ टाळा.

प्रोटीन आणि फायबर खा – पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रोटीन आणि फायबरयुक्त डाएटचे सेवन करा. या पोषकतत्वामुळे पचनास मदत होते. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वजन घटवण्यासही मदत होते.

पुरेसे पाणी प्या – पाणी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने शरीराची चरबी कमी होते आणि तुमचे पोट हेल्दी राहते. कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी दररोज प्यायले पाहिजे.

पुरेशी झोप – तणावामुळे तुमच्या पोटाची चरबी वाढू शकते. दरम्यान,पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोप पूर्ण न झाल्याने कार्टिसोल हार्मोन वाढते यामुळे वजन घटवण्यास अडथळा निर्माण होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -