Tuesday, April 29, 2025
Homeक्रीडाIPL 2025Hyderabad Sunrisers vs Gujrat Titans, IPL 2025: आजच्या सामन्यात हैदराबादला सूर गवसेल...

Hyderabad Sunrisers vs Gujrat Titans, IPL 2025: आजच्या सामन्यात हैदराबादला सूर गवसेल का?

मुंबई (ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामातील जबरदस्त संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहील जात होत त्यांची आजची स्थिती काही गंभीर आहे. सलग तीन सामन्यात झपाटून मार खाल्यामुळे हैदराबादचा संघ गुण तकत्यामध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. आज त्यांचा संघ फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही बाबतीत अत्यंत मजबूत स्थितीत आहे तरीपण त्यांना धावांचा पाठलाग करता येत नाही आहे किंबहुना चांगली धावसंख्या उभारू शकत नाही.

गेल्याच सामन्यात त्यांचे सुरवातीचे तिन्ही फलंदाज ४ व २ धावा काढून बाद झाले. हैदराबादला त्यांची व्यूव्ह्रचना बदलावी लागेल प्रत्येक चेंडू हा सीमापारच गेला पाहिजे हा विचार सोडवा लागेल. मैदानावर संयमाने खेळून जम बसवावा लागेल. गोलंदाजीमध्ये कमिन्स व समरजित सिंग यांना थोडा बदल करावा लागेल. एकूणच काय हैदराबाद संघाला जिंकण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल.

लागोपाठचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे गुजरात टायटन्स आज जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल. त्यांचे सुरवातीचे चारही फलंदाज समोरच्या गोलंदाजाचा धूव्वा उडवत आहेत आणि म्हणून त्यांचे जिंकण्याच्या संधी जास्त आहेत. आज गुजरातचा प्रयत्न असा असेल की नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेऊन हैदराबादला कमीत कमी धावांवर रोखणे. सध्याची गुजरातची गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे त्यांना हे सहज शक्य आहे.

हैदराबादसाठी जमेची बाजू म्हणजे आजचा सामना हा त्यांच्या घरच्या मैदानावर खेळला जाणार आहे आणि त्यामुळे त्यांचा संघ हाच प्रयत्न करेल की जास्ती जास्त धावा करण्याचा. चला तर बघूया गुजरात हॅट्रिक करते की हैदराबाद पुन्हा आपले वर्चस्व दाखवते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -