रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल
मुंबई : मध्य रेल्वेवर (Central Railway) लोणावळा आणि मळवली दरम्यान प्रस्तावित रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी ४ स्टील्सच्या लाँचिंगसाठी येत्या रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (Railway Block) घेण्यात येणार आहे. पहिला ब्लॉक हा रविवार ६ एप्रिल रोजी दुपारी २.०५ ते संध्याकाळी ४.०५ पर्यंत घेण्यात येईल. लोणावळा- मळवली विभागात उड्डाणपुलाच्या पायाभूत कामासाठी तीन दिवसीय ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ६ ते ८ एप्रिल दरम्यान असेल. या कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Lawrence Bishnoi : मुंबई पोलिसांनी ठोकल्या लॉरेन्स बिश्नोईच्या ५ शार्प शूटरला बेड्या!
या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एक्सप्रेस लोणावळा येथे दुपारी ४.०५ वाजेपर्यंत व लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्सप्रेस कर्जत येथे दुपारी ३.२० वाजेपर्यंत थांबवण्यात येईल. ग्वाल्हेर – दौंड एक्सप्रेस चौक येथे १० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान पुणे – लोणावळा ईएमयू आणि शिवाजी नगर – लोणावळा ईएमयू मळवली येथे खंडित केली जाईल. तर लोणावळा – पुणे ईएमयू आणि लोणावळा – शिवाजी नगर ईएमयू मळवली येथूनच परत पाठवली जाईल. (Railway Power Block) जाणून घ्या विशेष पॉवर ब्लॉक दरम्यान असणारे वेळापत्रक.
ब्लॉक १
रविवार, ६ एप्रिल रोजी दुपारी २.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल
- गाडी क्रमांक २२१५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा येथे दुपारी ४.०५ वाजेपर्यंत थांबवण्यात येईल.
- गाडी क्रमांक १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्स्प्रेस कर्जत येथे दुपारी ३.२० वाजेपर्यंत थांबवण्यात येईल.
- गाडी क्रमांक २२१९४ ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस चौक येथे १० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.
पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल
- गाडी क्रमांक ९९८१४ पुणे – लोणावळा लोकल आणि गाडी क्रमांक ९९८१६ शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
- गाडी क्रमांक ९९८१३ लोणावळा – पुणे लोकल आणि गाडी क्रमांक ९९८१५ लोणावळा – शिवाजी नगर लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.
ब्लॉक २
सोमवार, ७ एप्रिल रोजी दुपारी १.०५ ते दुपारी २.३५ पर्यंत
पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल
- गाडी क्रमांक ९९८१६ शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
- गाडी क्रमांक ९९८१३ लोणावळा – पुणे लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.
ब्लॉक ३
मंगळवार, ८ एप्रिल रोजी दुपारी १.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत
पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल
- गाडी क्रमांक ९९८१६ शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
- गाडी क्रमांक ९९८१३ लोणावळा – पुणे लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.