Friday, April 25, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वअमेरिकेचे नवे टॅरिफ धोरण जाहीर; मेक्सिको, कॅनडा आणि चीनला फटका तर भारताचे...

अमेरिकेचे नवे टॅरिफ धोरण जाहीर; मेक्सिको, कॅनडा आणि चीनला फटका तर भारताचे किरकोळ नुकसान

वॉशिंग्टन : अमेरिकेने नवे टॅरिफ धोरण जाहीर केले आहे. या धोरणाचा सर्वाधिक फटका मेक्सिको, कॅनडा आणि चीन या तीन देशांना बसणार आहे. भारताला अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे ०.०१ टक्के नुकसान होईल असा प्राथमिक अंदाज आहे.

Manipur : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर

भारत अमेरिकेला ज्या वस्तू निर्यात करतो त्यातील काही वस्तू अमेरिकेत तयार होणाऱ्या उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून आवश्यक आहेत. तसेच काही भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. या वस्तूंना व्यापक जनहिताचा विचार करुन टॅरिफमधून वगळण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेच्या नव्या टॅरिफचा भारताला जास्त फटका बसणार नाही. याउलट चीनवर आधीच २० टक्के टॅरिफ होता. आता आणखी ३४ टक्के टॅरिफ लागू होणार आहे. यामुळे चिनी वस्तूंवर अमेरिकेत थेट ५४ टक्के टॅरिफ लागू होणार आहे. या निर्णयाचा फटका चीनला बसणार आहे. चिनी वस्तू अमेरिकेत महाग होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत असे म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी भारत अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा देश असल्यामुळे भारताच्या बाबतीतले टॅरिफ धोरण लवचिक ठेवले आहे. निवडक वस्तूंवरच २६ टक्के टॅरिफ लागू केला आहे. यामुळे भारतीयांना जास्त फटका बसणार नाही. ट्रम्प प्रशासनाने युरोपियन यूनियनच्या वस्तूंवर २०, जपानच्या वस्तूंवर २४, दक्षिण कोरियाच्या वस्तूंवर २५, चिनी वस्तूंवर ३४ टक्के टॅरिफ नव्याने लागू केला आहे. अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे जगात नवे टॅरिफ युद्ध सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या टॅरिफ युद्धामुळे जागतिक पातळीवर आर्थिक मंदीची भीती व्यक्त होत आहे. अनेक देशांच्या जीडीपी अर्थात विकास दरावर प्रतिकूल परिणाम होण्याचीही शक्यता आहे.

अमेरिकेने लागू केलेल्या नव्या टॅरिफमुळे भारताच्या जीडीपीवर जास्तीत जास्त ०.०१ टक्के प्रतिकूल परिणामाची शक्यता व्यक्त होत आहे. कॅनडा आणि मेक्सिकोतून येणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेने फेब्रुवारीपासून २५ टक्के टॅरिफ लागू केला आहे. यामुळे मेक्सिकोचा जीडीपी दोन टक्क्यांनी घसरला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या नव्या टॅरिफमुळे कॅनडाच्या जीडीपीत १.०५ टक्क्यांची घट होण्याची चिन्हं आहेत. व्हिएतनामचा जीडीपी ०.९९ टक्क्यांनी वाढला आहे. थायलंडचा जीडीपी ०.९३ टक्के, तैवानचा जीडीपी ०.६८ टक्के, स्वित्झर्लंडचा जीडीपी ०.५९ टक्के, दक्षिण कोरियाचा जीडीपी ०.५८ टक्के, चीनचा जीडीपी ०.४८ टक्के, जपानचा जीडीपी ०.१९ टक्के, इंडोनेशियाचा जीडीपी ०.२० टक्के ने घसरण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या जीडीपीलाही ०.४९ टक्के फटका बसण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -