मुंबई : अभिजित बिचुकलेचं वर्णन करायचं झालं तर मोठे केसं, कपाळाला टिळा, हटके स्टाईल आणि राजकारणी भाषा या व्यतिरिक्तही बिचुकले त्याच्या गाण्यांसाठी बिग बॉसमध्ये प्रसिद्ध झाला होता. मात्र आता त्याच्या नव्या लूकने महाराष्ट्रभर हवा केली आहे.
Gulkand Marathi Movie : ‘गुलकंद’ मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
मोठ्या केसांवर हात फिरवत शाहरुख सारखी स्टाईल मारताना बिचुकले अनेकदा बिग बॉस या रिऍलिटी शो मध्ये दिसून आला. मात्र ही हेअरस्टाईल गेली २५ वर्ष अशीच आहे, असे बिचकुले तेव्हा म्हणाला होता. पण या हेअरस्टाईलवर बिचकुले याने आता नवा प्रयोग केला आहे. त्याचा हेअरस्टाईल बदललेला लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नव्या हेअरस्टाईलवर काय म्हणाला बिचुकले?
अभिजीत बिचुकले म्हणाला, माझी हेअर स्टाईल मराठी आणि हिंदी बिग बॉसमध्ये संपूर्ण भारताच्या तरुण पिढीच्या लक्षात राहिली. २५ वर्ष झाल्यामुळे माझे हेअर स्टाईलिस्ट आणि मी विचार करून हा नवा हेअर लूक केलेला आहे. माझ्या हेअर स्टाईलची प्रचंड क्रेझ आहे. २०१९ ला मराठी बिग बॉसमध्ये काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये माझी हेअर स्टाईल खूप फेमस झाली.